Maharashtra Election 2024: राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण? निकालाआधीच MVA आणि महायुतीच्या नेत्यांची नावं समोर

मुंबई तक

22 Nov 2024 (अपडेटेड: 22 Nov 2024, 12:09 PM)

Chief Minister Candidate Of Maharashtra: राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या शनिवारी 23 नोव्हेंबरला जाहीर केला जाणार आहे. तत्पूर्वी सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदासाठीच्या इच्छूक उमेदवारांची नावं समोर येत आहेत.

Who Will Be CM In Maharashtra?

Who Will Be CM In Maharashtra?

follow google news

बातम्या हायलाइट

point

राज्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा

point

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण?

point

महायुतीतही मुख्यमंत्रीपदासाठी होतेय रस्सीखेच?

Chief Minister Candidate Of Maharashtra: राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या शनिवारी 23 नोव्हेंबरला जाहीर केला जाणार आहे. तत्पूर्वी सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदासाठीच्या इच्छूक उमेदवारांची नावं समोर येत आहेत. आता महायुती किंवा मविआच्या कोणत्या नेत्याच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या निवडणुकीचा निकाल आमच्या बाजूने लागले, असा दावा महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जात आहे. राज्यात काँग्रेसच्या नेतृत्त्वात मविआचं सरकार बनले, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी म्हटलं होतं. परंतु, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी त्यांच्या विधानाचा समाचार घेतला. पटोलेंची भूमिका आम्हाला मान्य नाही. निवडणुकीत मविआला बहुमत मिळाल्यानंतर आम्ही घटक पक्षांसोबत चर्चा करून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवू, असं राऊत म्हणाले.

हे वाचलं का?

महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे), एनसपी (शरद पवार) यांचा समावेश आहे. तर महायुतीत भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि एनसीपी (अजित पवार) गटाचा समावेश आहे. राज्यात आमचंच सरकार स्थापन होईल, असा दावा या दोन्ही आघाड्यांनी केला आहे. महायुती सत्तेत येईल, असा अंदात अनेक एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. महायुतीकडून शिवसेनेचे प्रवक्ता संजय शिरसाट यांनी म्हटलं की, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात विधानसभा निवडणूक लढवली आहे. मतदारांनी एकनाथ शिंदे यांना पसंती दर्शवली आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, त्यांचा पूर्ण हक्क आहे, असं मला वाटतं. आम्हाला विश्वास आहे की, ते राज्याचे पुढचे मुख्यमंत्री होतील. 

हे ही वाचा >> Today Gold Rate: निवडणुकीच्या निकालाआधीच सोनं गडगडलं! मुंबईसह 'या' शहरांमध्ये सोन्याचा भाव काय?

भाजप नेते प्रवीण दरेकरांनी मुख्यमंत्रीपदासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नावाची घोषणा केलीय. दरेकर म्हणाले, "भाजपकडून कोणी मुख्यमंत्री होऊ शकतो, तर ते देवेंद्र फडणवीस आहेत", असं मला वाटतं. पुढचं सरकार हे महायुतीचं असणार आहे. महाविकास आघाडीत अंतर्गत वादविवाद सुरु आहेत. महायुतीचाच मुख्यमंत्री होईल. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनीही मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यासाठी अजित पवारांच्या नावावर जोर दिला आहे. मिटकरी म्हणाले, निवडणुकीचा निकाल काहीही असो, राष्ट्रवादी किंगमेकरच्या भूमिकेत असेल. मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत फडणवीसांनी म्हटलं, महायुतीत असलेले तिनही पक्ष एकत्र बसतील आणि यावर निर्णय घेतील.

हे ही वाचा >> Maharashtra Assembly Election 2024 Live : मविआ किमान 160 जागा जिंकेल! संजय राऊतांचं मोठं विधान

    follow whatsapp