Arvind Sawant : 'माल' शब्द वापरणं भोवणार? शिवसेना महिला आघाडी अरविंद सावंतांविरोधात थेट....

मुंबई तक

01 Nov 2024 (अपडेटेड: 01 Nov 2024, 02:54 PM)

अरविंद सावंत यांनी माध्यमांशी बोलताना माल हा शब्द वापरल्यानं शिवसेना उमेदवार शायना एनसी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

अरविंद सावंत यांच्या वक्तव्यावरुन वाद

point

माल शब्द वापरल्यानं शायना एसनसी आक्रमक

point

शायना एनसी यांच्यासाठी महिला शिवसैनिकही धावल्या

दिवाळीचे फटाके फुटण्यास सुरू होण्यापूर्वीच दुसरीकडे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे बॉम्ब फुटायला सुरुवात झाली आहे. राज्यभर सर्वच पक्षांनी प्रचाराचा नारळ वाढवून मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतंय. अशातच मुंबईतले उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांच्या एका वक्तव्यानं एक नवा वाद उभा राहिला आहे. मुंबईतील मुंबादेवी मतदारसंघात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून शायना एनसी या निवडणूक लढणार आहेत. तर मविआकडून अमिन पटेल यांना उमेदवारी आहे. या लढतीविषयी बोलतानाच अरविंद सावंत यांनी या मतदारसंघात 'बाहेरचा माल चालणार नाही' असं म्हटल्यानं वादाला तोंड फुटलंय. त्यानंतर आता माल या शब्दावर आक्षेप घेत शिंदेंच्या शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. 

हे वाचलं का?

 

हे ही वाचा  >>Baramati: लोकसभेच्या शेवटच्या दिवसाचा बदला पवारांनी पहिल्याच दिवशी बारामतीत घेतला...

 

शायना एनसी कोणत्या रीन साबणीची गोष्ट करतायत, त्या आम्हाला जनतेच्या कसं काढणार? त्यांना आपला स्वत:चाच रंग माहिती नाही. काल वेगळा रंग, आज वेगळा रंग, कालच त्या वेगळ्या पक्षात गेल्यात. इम्पोर्टेड माल नहीं चलेगा... असं अविंद सावंत एएनआयशी बोलताना बोलले. त्यानंतर आता त्यांच्या वक्तव्यामधील माल या शब्दावर आक्षेप घेत आक्रमक भूमिका शायना एनसी यांनी घेतली आहेत. त्यानंतर आता शायना एनसी यांनी या वक्तव्यावरुन, संपूर्ण मविआच्या नेत्यांवर  निशाणा साधला.  माल शब्द वापरणाऱ्या या महाविकास आघाडीला बेहाल करू असं म्हणत त्यांनी अरविंद सावंत यांच्याविर पलटवार केलाय.

शिवसेनेच्या चिन्हावर लढत असलेल्या शायना एनसी यांच्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेच्या महिला शिवसैनिकही धावून आल्या आहेत. अरविंद सावंत यांनी केलेल्या विधानाविरोधात मुंबादेवी मतदार संघाच्या शिवसेना उमेदवार शायना एन.सी आज शुक्रवार दि. १ नोव्हेंबर २०२४ रोजी नागपाडा पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत तिथे शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्याही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आता यावर पोलीस काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं असेल. 


अरविंद सावंत यांचं स्पष्टीकरण काय?

 

हे ही वाचा  >>Mumbai Tak Chavdi: 'लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळतात, तुम्ही 3000 देणार का?', नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं

 


"मी त्यांचं नाव देखील घेतलेलं नाही. वस्तूला हिंदीत काय बोलतात?सरड्या सारखी रंग बदलणारी माणसं आहेत. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मी माझ्या उमेदवाराला पण म्हटलं की ओरिजनल माल इथे आहे...मग त्याचा अपमान झाला का? महिलेची विवस्त्र धिंड काढतात तेव्हा पंतप्रधान मोदी त्यावर एक अवाक्षर बोलले नाहीत. याची त्यांना आठवण करून द्या" असं म्हणत अरविंद सावंत यांनी आपल्यावरचे आरोप फेटाळून लावलेत. 
 

    follow whatsapp