'या' तीन राशींच्या लोकांचं नशीबच चमकणार, आता होणार भाग्योदय!

April 2025 Astrology : सुनफा योग वैदिक ज्योतिष शास्त्रात एक शुभ योग आहे. जेव्हा चंद्रमाच्या दुसऱ्या परिवर्तनात एखादा शुभ ग्रह (सूर्य,राहू आणि केतुला सोडून, गुरु, शुक्र, बुध किंवा मंगल) उपस्थित असेल.

Sunapha Yoga astrology In April 2025

Sunapha Yoga astrology In April 2025

मुंबई तक

22 Apr 2025 (अपडेटेड: 22 Apr 2025, 03:30 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोणत्या राशींचं भाग्य उजळणार?

point

सुनफा योगमुळे या राशींचं नशिब चमकणार!

point

जाणून सुनफा योगाबाबतचं राशी भविष्य

April 2025 Astrology : सुनफा योग वैदिक ज्योतिष शास्त्रात एक शुभ योग आहे. जेव्हा चंद्रमाच्या दुसऱ्या परिवर्तनात एखादा शुभ ग्रह (सूर्य,राहू आणि केतुला सोडून, गुरु, शुक्र, बुध किंवा मंगल) उपस्थित असेल. हा योग धन, समृद्धी, बुद्धीमत्ता आणि सामाजिक सन्मानाचं प्रतिक आहे.

हे वाचलं का?

जेव्हा हा योग सक्रिय होतो, तेव्हा धनसंपत्तीत स्थिरता, करिअरमध्ये प्रगती आणि सामाजिक जीवनात प्रतिष्ठा वाढते. शुभ ग्रहांचं गोचर, उदा. गुरु ग्रहाचं धन-संपत्तीत प्रभाव, वित्तीय लाभ आणि बोद्धिक विकास वाढवतं. तर शुक्र आणि बुध ग्रहाची शुभ स्थिती रचनात्मक, संचार आणि सामाजित नेटकवर्किंगला वाढवू शकते. 

अॅस्ट्रोलॉजर चिराग दारुवाला यांनी एनबीटीच्या मुलाखतीत म्हटलं की, या आठवड्यात तीन राशींसाठी हा योग विशेषत: शुभ मानला जाणार आहे. शुभ ग्रहांचं गोचर रचनात्मक स्थिती बदलणार आहे. तर साध्य योग आणि शुभ संयोग या राशींना आणखी मजबूत करतील.

मेष राशी

सुनफा योग या आठवड्यात मेष राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ राहणार आहे. कारण चंद्रमाच्या गोचर दरम्यान, वृषभ राशीत गुरुची उपस्थिती राहील. यामुळे या राशींच्या लोकांना गूंतवणुकीत, व्यापार आणि नोकरीत लाभ मिळेल.

हे ही वाचा >> मॉडेलचे खळबळ उडवून देणारे आरोप, क्रिकेटपटू अमित मिश्राविरोधात तक्रार; आरोप करणारी 'ती' कोण?

मिथुन राशी 

मिथुन राशीसाठी सुनफा योग या आठवड्यापासून शुभ प्रभाव टाकेलं. तर कर्क राशीत शुभ ग्रहांचाही समावेश होईल. दरम्यान, शुक्र आणि बुधचा गोचर सुनफा योगला सपोर्ट करेल, यामुळे व्यापार आणि सामाजिक नेटवर्किंगमध्ये लाभ होईल. 

धनू राशी

धनू राशीच्या लोकांसाठी सुनफा योग या आठवड्यात शुभ राहील. कारण चंद्रमाच्या गोचर दरम्यान वृश्चिक राशीत मंगल किंवा बुध ग्रहाची उपस्थिती सुनफा योगला सक्रीय करू शकते. यामुळे उच्च शिक्षण, संपत्ती, वित्तीय गुंतवणूकीत लाभ होऊ शकतो.

हे ही वाचा >> Today Gold Price: विषयच संपला... ज्याचा विचार कधीही केला नव्हता तेच झालं, सोन्याचा आजचा भाव पाहूनच जाल हादरून!

    follow whatsapp