नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज (7 जून) देशाला संबोधित करताना अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. दरम्यान, यावेळी त्यांनी देशामध्ये लसीकरणावरुन (Vaccination) सुरु असलेला गोंधळ आणि आरोग्य व्यवस्थेबाबत राज्य सरकारांना बरंच सुनावलं आहे.
ADVERTISEMENT
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी सर्वात मोठी घोषणा अशी केली की, 21 जूनपासून 18 वर्षांवरील सर्व नागरिकांचं मोफत लसीकरण (Free Vaccination) करणार आहे. तसेच राज्य सरकारांकडे जो लसीकरणाचा 25 टक्के कारभार सोपविण्यात आला होता तो देखील केंद्र आता स्वत:च पार पाडणार आहे.
यासारख्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर पंतप्रधान मोदींनी यावेळी भाष्य केलं आहे. जाणून घेऊयात त्यापैकीच 10 महत्त्वाचे मुद्दे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबोधनातील 10 महत्त्वाचे मुद्दे:
1. आता लसीकरणाची 100 टक्के जबाबदारी केंद्र सरकारची असणार आहे. याआधी जे 25 टक्के जबाबदारी राज्य सरकारांना देण्यात आली होती ती देखील आता केंद्र सरकारच पार पाडणार आहे.
2. 21 जूननंतर 18 वर्षावरील नागरिकांचं केंद्र सरकारच्या मार्फत मोफत लसीकरण केलं जाणार
3. दिवाळीपर्यंत म्हणजेच नोव्हेंबर 2021 पर्यंत गरीबांना मोफत धान्य दिलं जाणार आहे.
4. देशातील 80 कोटी नागरिकांना मोफत धान्य केंद्र सरकार देणार आहे.
Big News : 21 जूनपासून 18 वर्षांवरील सगळ्यांना मोफत लस-पंतप्रधान
5. कोरोना लस हे आपलं सुरक्षा कवच आहे, देशात आतापर्यंत 23 कोटी लसींचे डोस देण्यात आली आहेत.
6. एका वर्षात भारतात दोन नव्या लसी बनविण्यात आल्या.
7. आपल्याकडे नोझल लसीबाबत देखील संशोधन सुरु आहे. तसेच लसींची उपलब्धता वाढविण्यासाठी इतर देशातील कंपन्यांसोबत चर्चा सुरु आहेत.
8. देशात सध्या 7 कंपन्यांकडून लस तयार करण्याचं काम सुरु आहे.
PM Modi’s speech LIVE: पंतप्रधान मोदींनी आपल्या संबोधनात काय-काय घोषणा केल्या?
9. अनेक ठिकाणी अनलॉक करण्यात येत आहे. पण त्यामुळे कोरोना गेला आहे असं समजू नका. काळजी घ्या.
10. खासगी रुग्णालये लसीकरणाच्या निर्धारित किंमतीच्या एका डोसवर 150 रुपयांहून अधिक सर्विस चार्ज लावू शकत नाही.
पंतप्रधान मोदींच्या आजच्या संबोधनातील हे 10 महत्त्वाचे मुद्दे आहेत. मात्र, याशिवाय पंतप्रधान मोदी यावेळी नेमकं काय-काय म्हणाले हे आपण या व्हीडिओमधून देखील पाहू शकतात.
ADVERTISEMENT