Nitesh Rane On Ladki Bahin Yojana: महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा 1500 रुपयांचं आर्थिक सहाय्य दिलं जात आहे. महायुतीचं नवं सरकार स्थापन झाल्यानंतर महिलांना सहाव्या हफ्त्याच्या रक्कमेची प्रतिक्षा लागली आहे. अशातच भाजप नेते नितेश राणे यांनी या योजनेबाबत मोठं विधान केलं आहे. राणे म्हणाले, "महायुतीच्या योजनांचा लाभ घेणाऱ्या लोकांमध्ये मुस्लिम समाजाचे लोक अधिक आहेत. ज्यांना दोन पेक्षा जास्त मुलं आहेत, त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही पाहिजे, अशी मागणी मी सरकारकडे केली आहे".
ADVERTISEMENT
माध्यमांशी बोलताना राणे म्हणाले, ज्यांना दोनपेक्षा जास्त मुलं आहेत, त्यांना (आदिवासी समाज सोडून) या योजनेपासून बाहेर केलं पाहिजे, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. जे लोक महायुती सरकारला समर्थन देत आहेत, त्यांनाही या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. इतर लोकांना ज्यांना दोनपेक्षा जास्त मुलं आहेत. त्यांना या योजनेतून बाहरे केलं पाहिजे.
हे ही वाचा >> दिल्लीत नवा डाव, अमित शाह गेले शरद पवारांच्या घरी, 'ही' भेट अन् बरंच काही!
निवडणुकीत लाडकी बहीण योजना ठरली गेम चेंजर
राज्यात महायुती सरकारला बहुमत मिळण्यात लाडकी बहीण योजनेनं महत्त्वाची भूमिका बजावली आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मतदान मिळाल्याचं, महायुतीचे नेते सांगत आहेत. या मतदानामुळे निवडणुकीत विजय मिळाल्याचंही या नेत्यांचं म्हणणं आहे. योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यात आलं. त्यामुळे राज्यात महायुतीला अधिक समर्थन मिळालं.
हे ही वाचा >> Retail Inflation : गूड न्यूज! महागाई झाली कमी; RBI साठी मोठा दिलासा, काय काय झालं स्वस्त? जाणून घ्या
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही लाडकी बहीण योजनेबाबत मोठी प्रतिक्रिया दिली होती. "या योजनेत लाभार्थ्यांच्या अर्जाच्या नोंदीची तपासणी केली जाईल. ज्या महिलांनी योजनेच्या नियमांचं पालन केलं नाही, त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्या महिलांना या योजनेतून बाहेर केलं जाईल", असं फडणवीस म्हणाले होते. तर भाजप नेते सुधीर मुनगंटीवर म्हणाले होते की, "लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना देण्यात येणाऱ्या पैशांमध्ये शंभर टक्के वाढ होईल. जर आम्ही 1500 रुपयांचे 2100 केले नाहीत, तर देशातील निवडणुकांमध्ये वेगळा मेसेज जाईल. आम्ही आमचं वचन पूर्ण केलं नाही, अशी चर्चा संपूर्ण देशात सुरु होईल. मी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे. आम्हाला हे वचन सत्यात उतरवायचं आहे. आम्ही जाहीरनाम्यात केलेल्या घोषणेला निश्चितपणे पूर्ण करू".
ADVERTISEMENT