डोंबिवली : निर्माणाधीन इमारतीच्या लिफ्टसाठी खणलेल्या खड्ड्यात पडून १० वर्षीय मुलाचा मृत्यू

मुंबई तक

• 11:17 AM • 19 Jan 2022

बांधकाम सुरु असलेल्या इमारतीत लिफ्टसाठी खणलेल्या खड्ड्यात पडून एका १० वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. सत्यम मौर्य असं या मुलाचं नाव असून तो आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. मानपाडा पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. डोंबिवली पुर्वेकडील सागाव परिसरात राहणारे राजकुमार मौर्य हे एका भंगारच्या दुकानात काम करतात. पत्नी, एक मुलगा […]

Mumbaitak
follow google news

बांधकाम सुरु असलेल्या इमारतीत लिफ्टसाठी खणलेल्या खड्ड्यात पडून एका १० वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. सत्यम मौर्य असं या मुलाचं नाव असून तो आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. मानपाडा पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

हे वाचलं का?

डोंबिवली पुर्वेकडील सागाव परिसरात राहणारे राजकुमार मौर्य हे एका भंगारच्या दुकानात काम करतात. पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी अस त्यांचं कुटुंब आहे. मंगळवारी संध्याकाळी राजकुमार यांचा १० वर्षाचा मुलगा सत्यम खेळण्यासाठी बाहेर गेला. जवळपास दोन तास मुलगा घरी न आल्याने कुटुंबियांनी त्याचा शोध सुरू केला.

तासभर शोध घेतल्यानंतरही सत्यम सापडला नाही त्यामुळे मौर्य कुटुंबाने घराजवळच सुरु असलेल्या एका निर्माणाधीन इमारतीत त्याचा शोध घेतला असता, लिफ्टसाठी खणलेल्या खड्ड्यात सत्यमचा मृतदेह आढळून आला. सत्यमचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला असून या प्रकरणात बांधकाम व्यवसायिकाविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी होते आहे.

पुण्यातून अपहरण झालेला चार वर्षांचा डुग्गु सापडला, अपहरणाचं कारण मात्र गुलदस्त्यातच

    follow whatsapp