उमेश कोल्हे हत्या प्रकरणातला १० वा आरोपी अटकेत, NIA ची कारवाई

मुंबई तक

12 Aug 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 09:11 AM)

अमरावतीतल्या उमेश कोल्हे हत्या प्रकरणातला दहावा आरोपी शेख छोटूला राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने अटक केली आहे. महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये झालेल्या उमेश कोल्हे हत्या प्रकरणातला हा दहावा आरोपी आहे. २८ वर्षीय शेख छोटूची या हत्या प्रकरणात सक्रिय भूमिका असल्याचा आरोप आहे. त्यावरूनच त्याला NIA ने अटक केली आहे. अमरावती हत्याकांड | उमेश कोल्हे हत्याकांड में 28 […]

Mumbaitak
follow google news

अमरावतीतल्या उमेश कोल्हे हत्या प्रकरणातला दहावा आरोपी शेख छोटूला राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने अटक केली आहे. महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये झालेल्या उमेश कोल्हे हत्या प्रकरणातला हा दहावा आरोपी आहे. २८ वर्षीय शेख छोटूची या हत्या प्रकरणात सक्रिय भूमिका असल्याचा आरोप आहे. त्यावरूनच त्याला NIA ने अटक केली आहे.

हे वाचलं का?

अमरावतीत २१ जूनला नेमकं काय घडलं?

राजस्थानच्या उदयपूरमध्ये जी कन्हैय्या शर्माच्या हत्येची घटना समोर आली तशीच घटना महाराष्ट्रातल्या अमरावतीत झाली आहे. मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या एका विशिष्ट समाजाच्या लोकांनी चायनीज सुरा मारून केली. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी सुरूवातीला पाच जणांना अटक केली होती. लोकांनी केलेल्या मागणीनंतर हे प्रकरण एनआयएकडे म्हणजेच राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे देण्यात आलं. एनआयने या प्रकरणात आता दहावी अटक केली आहे. शेख छोटू असं अटक करण्यात आलेल्या दहाव्या आरोपीचं नाव आहे.

महाराष्ट्रातल्या अमरावती या ठिकाणी कोतवाली पोलीस ठाणे भागात येणाऱ्या चर्चच्या मागे २१ जून रोजी अमित मेडिकल चालवणारे व्यापारी उमेश कोल्हे हे आपल्या मुलासह आणि सुनेसह दुकान बंद करून परतत होते. त्यावेळी तीन बाईकस्वारांनी त्यांच्यावर वार केले आणि त्यांची हत्या केली.

उमेश कोल्हे यांचा मुलगा आणि सुनेच्या समोरच ही घटना घडली. उमेश कोल्हे यांना तातडीने रूग्णालयात नेण्यात आलं. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. यानंतर आता उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांचं समर्थन केलं होतं म्हणून त्यांची हत्या करण्यात आली असा आरोप होऊ लागला आहे. नुपूर शर्माला समर्थन देणारी पोस्ट उमेश कोल्हे यांनी त्यांच्या स्टेटसवर ठेवली होती असंही समोर येतं आहे.

उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी काय म्हटलं आहे?

पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश कोल्हे हत्या प्रकरणात सहा आरोपींना अटक करण्यात आली. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास केला. त्यात प्रथमदर्शनी उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांना पाठिंबा देत जी पोस्ट केली होती त्यातूनच त्यांची हत्या झाल्याचं निष्पन्न झालं आहे. आत्तापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे असंही त्यांनी सांगितलं. मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या एका विशिष्ट समाजाच्या लोकांनी चायनीज सुरा मारून केली. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

उमेश कोल्हे यांचा मुलगा आणि सुनेच्या समोरच ही घटना घडली. उमेश कोल्हे यांना तातडीने रूग्णालयात नेण्यात आलं. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. यानंतर आता उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांचं समर्थन केलं होतं म्हणून त्यांची हत्या करण्यात आली असा आरोप होऊ लागला आहे.

    follow whatsapp