Maharashtra BJP Minister list: नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा आज (15 डिसेंबर) महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये विस्तार होणार आहे. त्याआधी ज्या आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश होणार आहे, त्यांना फोन जाणं सुरू झालं आहे. आतापर्यंत नितेश राणे, पंकजा मुंडे, गिरीश महाजन या आमदारांना भाजपकडून फोन आले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील आमदारांनाही मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी निमंत्रण दिलं जात आहे. ज्या आमदारांना फोन आले आहेत ते आता टीम फडणवीसमध्ये सहभागी होणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यापैकी भाजपच्या मंत्र्यांची यादी ही आता समोर आली आहे. (Devendra Fadnavis give a chance ministerial berths to these bjp leaders see the list of bjp ministers)
ADVERTISEMENT
आज दुपारी 4 वाजता फडणवीस मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. त्यासाठी नागपुरात भव्य मंचही तयार करण्यात आला असून, उर्वरित तयारी सुरू आहे. महाआघाडीत समाविष्ट भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कोट्यातील 35 आमदार मंत्री होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा>> Maharashtra Cabinet Expansion LIVE: भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळाची यादी आली समोर, थोड्याच वेळात शपथविधी होणार
भाजपच्या कोट्यातून 20 आमदार मंत्री होतील, ज्यामध्ये पक्ष काही जागा रिक्त ठेवू शकतं. तर शिवसेनेच्या 13 आणि राष्ट्रवादीच्या 10 आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळणार आहे. याशिवाय महाराष्ट्र बीसीसीआयचे कोषाध्यक्ष आशिष शेलार यांचाही मंत्रिमंडळात समावेश होणार आहे.
भाजपकडून 'हे' होणार मंत्री
- नितेश राणे,
- शिवेंद्रराजे भोसले
- गिरीश महाजन
- चंद्रशेखर बावनकुळे
- आशिष शेलार
- पंकज भोयर
- मेघना बोर्डिकर
- पंकजा मुंडे
- जयकुमार रावल
- मंगलप्रभात लोढा
- चंद्रकांत पाटील
- अतुल सावे
- माधुरी मिसाळ
हे ही वाचा>> Exclusive: 'शिंदेंना नाराज व्हायचं काही कारणच नाही, कारण...' अमित शाहांचं सूचक विधान
दरम्यान, अद्यापही काही जणांना फोन जाणं सुरू आहेत. त्यामुळे ही यादी थोड्या वेळात अपडेट होईल.
ADVERTISEMENT