कोरोनाच्या लाटेवर नियंत्रण ठेवण्यासाठी एकीकडे सरकारी यंत्रणा जनतेला गर्दी करु नका आणि नियमांचं पालन करण्याची सक्ती करत आहेत. परंतू दुसरीकडे सत्ताधारी पक्षातले कार्यकर्तेच सरकारी नियमांना हरताळ फासत असल्याचं समोर येतंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन नेते आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि सध्या शिवसेनेच्या तिकीटावर जिल्हा परिषद सदस्य असलेल्या देवराम लांडे यांच्या मुलाच्या लग्नात सर्व नियम मोडत सुमारे २ हजारांची गर्दी जमा झाली होती.
ADVERTISEMENT
या प्रकरणी जुन्नर पोलिसांनी नवरदेवाचे वडील, सासरे, मंगल कार्यालयाचा मालक आणि इतर ६ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
शिवसेनी किल्ल्याच्या पायथ्याशी बारव भागात झालेला हा लग्नसोहळा चांगलाच चर्चेत होता. दोन दिवस चाललेल्या या लग्नसोहळ्याला अनेक राजकीय मंडळी, आजी-माजी आमदार हजर होते. महालक्ष्मी कार्यालयाचे मालक केदारी, देवराम सखाराम लांडे,बाळू सखाराम लांडे, एकनाथ सिताराम कोरडे (रा. माणकेश्वर) व चैतन्य उल्हास मिंडे( रा.तांबे ता. जुन्नर जि.पुणे व सुधीर नामदेव घिगे (रा. दुधनोली ता.मुरबाड जि.ठाणे) यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.
२८ तारखेला जुन्नर पोलीस ठाण्याच्या पथकाने या ठिकाणी भेट दिली असता सर्व नियम धाब्यावर बसवले जात असल्याचं त्यांना लक्षात आलं. तसेच सध्याच्या नियमांप्रमाणे लग्नसोहळ्यांना ठराविक माणसांना परवानगी असताना या लग्नसोहळ्यात २ हजारांच्या घरात माणसं जमली होती. त्यामुळे जमावबंदीचा आदेश मोडल्याप्रकरणी या लग्नसोहळ्याच्या आयोजकांवर कारवाई करण्यात आली आहे.
मंदिरं उघडण्यासाठी सरकारला अडचण काय आहे? अण्णा हजारेंचा सरकारला सवाल
ADVERTISEMENT