ऐरोली सेक्टर १० येथील सागर दर्शन सोसायटीमध्ये राहणाऱ्या दोन सख्या बहिणींनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज संध्याकाळी समोर आली आहे. याबाबत अधिक तपास रबाळे पोलिस करीत आहे. ऐरोली सेक्टर १० येथील सागर दर्शन सोसायटी मधील बिल्डिंग नं बी-१५, येथे अनेक वर्षापासून वास्तव करणाऱ्या लक्ष्मी पंथारी व स्नेहा पंथारी या दोघींनी आत्महत्या केली.
ADVERTISEMENT
या दोन्ही बहिणी सुशिक्षीत असून लहान मुलांचे क्लासेस घेऊन उदरनिर्वाह करत होत्या. या दोन्ही बहिणींच्या वडिलांचे आधीच निधन झाले असून दहा वर्षांपूर्वी त्यांच्या आईने सुद्धा आत्महत्या केल्याचं समजतं आहे. सोसायटी मध्ये त्यांचा शेजारचा कोणाबरोबर अधिक संपर्क नव्हता.
दोन दिवस दरवाजा बंद असल्याने अचानक दुर्गंधी सुटल्याने आसपासच्या रहिवाश्यांनी दरवाजा ठोठावला. परंतु प्रतिसाद मिळाला नाही म्हणून शेजारच्या लोकांनी माजी नगरसेवक विजय चौगुले, मामित चौगुले यांना याबाबत माहिती दिली. यानंतर चौगुले यांनी घटनास्थळी खातरजमा केल्यावर पोलिसांना संपर्क साधला. पोलिसांनी दरवाजा तोडल्यावर आतमध्ये दोन तरुणीचे गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढलून आले. कोरोनाच्या आर्थिक तडाख्याने या दोन्ही बहिणींनी आत्महत्या केल्याचा कयास व्यक्त केला जात आहे.
ADVERTISEMENT