– एजाज खान
ADVERTISEMENT
कामावरून परतणाऱ्या एका तरुणीवर चार तरुणांनी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना मुंबईतील गोवंडी भागात घडली आहे. एका झोपडीत नेऊन आरोपींनी तरुणीवर अत्याचार केले आणि फरार झाले. तरुणीने घटनास्थळावरूनच पोलिसांना फोन करून आपबीती सांगितली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली. सामूहिक अत्याचार करणाऱ्या चौघांपैकी दोन नराधमांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
गोवंडीतील शिवाजीनगर भागात तरुणीवर सामूहिक अत्याचाराची ही घटना घडली. कामावरून घरी जात असतानाच ओळखीतील तरुणानेच विश्वासघात करत तिला निर्मनुष्य ठिकाणी नेल्याची माहिती पोलिसांनी दिली.
बुलढाणा : गळफास घेताना सेल्फी घेत विवाहीतेची आत्महत्या, पतीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
नेमकी घटना काय?
20 वर्षीय युवती एका हॉलमध्ये केटरिंग काम करते. सर्व काम आटोपून तरुणी सकाळी शिवाजीनगर भागात असलेल्या आपल्या घरी निघाली होती. यावेळी एका ओळखीच्या तरुणाने तिला ‘इतक्या उशिरा कुठे गेली होती?’, असं विचारलं आणि ‘तुझ्याशी काही बोलायचं’, असं म्हणून एका निर्मनुष्य झोपडीत नेले.
या झोपडीत त्याचे 3 साथीदार अगोदरच येऊन बसलेले होते. झोपडीत नेऊन चौघांनी तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर हे चौघे घटनास्थळावरून फरार झाले. त्यानंतर घाबरलेल्या तरूणीने तिथूनच पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून आपबीती सांगितली. माहिती कळताच निर्भया पथक घटनास्थळी दाखल गेले.
CCTV: भर रस्त्यात सायकलवरुन जाणाऱ्या पत्नीवर फेकलं अॅसिड, नागपुरातील धक्कादायक घटना
निर्भया पथकाने पीडितेला पोलीस स्टेशनला आणून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंत पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी 10 पथकं तयार केली. पथकांनी लगेच आरोपींचा शोध सुरू केला.
यातील दोन आरोपी हे मूळचे उत्तर प्रदेशातील वस्ती जिल्ह्यातील आहेत. दोघेही आपल्या गावी निघून जाण्याच्या तयारीत होते. पोलिसांनी या दोन्ही नराधमांना गावी पळून जाण्यापूर्वीच डोंगरी येथे अटक केली. इतर दोन आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
साताऱ्यात विवाहितेचा छळ करून खून, सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल
अटक करण्यात आलेले आरोपी हे अल्पवयीन आहेत, तर फरार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन रजाने यांनी दिली.
ADVERTISEMENT