यवतमाळमध्ये कोरोनाचा कहर पाहण्यास मिळतो आहे. कारण गेल्या चोवीस तासांमध्ये यवतमाळमध्ये 13 रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. 790 नवे रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 36 हजार 381 इतकी झाली आहे. आज घडीला यवतमाळ जिल्ह्यात 4 हजार 62 रूग्ण अॅक्टिव्ह आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात एकूण 795 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्यू दर 2.19 टक्के इतका आहे.
ADVERTISEMENT
भंडाऱ्यात दिवसभरात 1478 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. तर 24 रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. भंडाऱ्यात एकूण 32 हजार 460 रूग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. आज घडीला भंडाऱ्यात 11 हजार 507 रूग्ण अॅक्टिव्ह आहेत. आत्तापर्यंत भंडारा जिल्ह्यात एकूण 472 मृत्यू झाले आहेत. भंडाऱ्याचा मृत्यू दर 1.45 टक्के आहे
Corona Cases: कोरोना बरा होण्यापूर्वीच रुग्णाला हॉस्पिटलमधून सुट्टी, नेमका कारभार तरी कसा सुरु आहे?
भंडारा जिल्ह्यात आज 835 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 20481 झाली असून आज 1478 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 32460 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 63.09 टक्के आहे. आज 5855 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 1478 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. आतापर्यंत 2 लाख 66 हजार 898 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 32460 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.
चंद्रपुरात कोरोना आऊट ऑफ कंट्रोल, बेड्ससाठी रूग्णांचा चंद्रपूर ते तेलंगणा प्रवास
जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 574, मोहाडी 102, तुमसर 152, पवनी 222, लाखनी 157, साकोली 185 व लाखांदुर तालुक्यातील 86 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 20481 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोना बाधितांची संख्या 32460 झाली असून 11507 क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या 24 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 472 झाली आहे.
ADVERTISEMENT