नाशिकच्या आदिवासी विकास महामंडळातील नोकर भरतीत ३०० कोटींचा घोटाळा?

मुंबई तक

• 09:22 AM • 11 Dec 2021

प्रवीण ठाकरे, प्रतिनिधी, नाशिक आदिवासी विकास महामंडळातील नोकर भरतीत अनियमितता केल्याप्रकरणी महामंडळाचे तत्कालीन महाव्यवस्थापक – प्रशासन नरेंद्र मांदळे, चौकशी अधिकारी तथा तत्कालीन अप्पर आयुक्त अशोक लोखंडे आणि कुणाल आयटी ह्या पुण्यातील संस्थेचे संचालक संतोष कोल्हे यांच्याविरुद्ध भरती प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी नाशिकच्या मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. नोकरभरती प्रकरणी आदिवासी महामंडळातील मोठ्या […]

Mumbaitak
follow google news

प्रवीण ठाकरे, प्रतिनिधी, नाशिक

हे वाचलं का?

आदिवासी विकास महामंडळातील नोकर भरतीत अनियमितता केल्याप्रकरणी महामंडळाचे तत्कालीन महाव्यवस्थापक – प्रशासन नरेंद्र मांदळे, चौकशी अधिकारी तथा तत्कालीन अप्पर आयुक्त अशोक लोखंडे आणि कुणाल आयटी ह्या पुण्यातील संस्थेचे संचालक संतोष कोल्हे यांच्याविरुद्ध भरती प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी नाशिकच्या मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

नोकरभरती प्रकरणी आदिवासी महामंडळातील मोठ्या अधिकाऱ्यांविरूद्‌ध तब्बल पाच वर्षांनंतर गुन्हा दाखल आला आहे, सन २०१५-१६ मध्ये आदिवासी विकास महामंडळ व शबरी महामंडळातील ५८४ रिक्त जागांसाठी नोकर भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. प्रक्रियेनुसार डिसेंबर २०१५ मध्ये लेखी परीक्षा होऊन पुढे फेब्रुवारीत निकाल जाहीर करण्यात आला होता. परंतु, शासनाने नेमून दिलेल्या संस्थेऐवजी खासगी संस्थेमार्फेत ही भरती प्रक्रिया राबविण्यात आली. यात तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक बाजीराव जाधव, महाव्यवस्थापक नरेंद्र मांदळे आणि कुणाल आयटी कंपनीचे संचालक संतोष कोल्हे यांनी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी आपल्या संपर्कातील उमेदवारांची वर्णी लावली असे आरोप माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी केले होते.

तसेच ह्या पूर्ण प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती, या अनुषंगाने तत्कालीन विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना करणयात आल्या होत्या. त्यानुसार डवले यांनी ह्या प्रकरणात अधिकाऱ्यांकडून मोठी अनियमितता व आर्थिक गैरव्यवहार झाल्या असल्याचा अहवाल शासनास देत कायदेशीर कार्बाईची शिफारस केली होती. त्यानुसार दोन वरिष्ठ अधिकाऱ्याने निलंबित देखील करण्यात आले होते. तर महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांनी ही भरती प्रक्रिया रद्द केली होती.

डवले यांच्या अहवालानुसार संबंधित आधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यास मागील पाच वर्षात आजी-माजी मंत्र्यांकडूनच टाळाटाळ करत एकप्रकारे पाठिशी घालण्याचा प्रकार सुरु होता. दुसरीकडे खासदार चव्हाण यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा सुरुच होता.

अखेर नव्याने व्यवस्थापकीय संचालक म्हणून रुजू झालेले दीपक सिंगला यांनी या प्रकरणी लक्ष घालत शासनाच्या परवानगीनुसार मांदळे, लोखंडे आणि कोल्हे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. महाव्यस्थापक जालिंदर आभाळे यांनी याप्रकरणी एक आठवड्यापूर्वी मुंबईनाका पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुरुवारी ९ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल झाला आहे.

महामंडळाचा कारभार हाती घेतल्यानंतर याप्रकरणाची संपूर्ण माहिती घेतली. त्यानुसार नोकरभरती प्रकरणातील संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाजीराव जाधव यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यासाठी परवानगी मागितली आहे. ती मिळताच त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला जाईल.

    follow whatsapp