आषाढी एकादशी २०२१ : ‘ग्यानबा तुकाराम’च्या गजरात तुकोबांची पालखी पंढरपूरला रवाना

मुंबई तक

• 06:39 AM • 19 Jul 2021

राज्यातल्या समस्त वारकरी समुदायाचं लक्ष ज्या सोहळ्याकडे असतं तो आषाढी एकादशीचा सोहळा आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पायी पालखी सोहळ्याला परवानगी देण्यात आलेली नाहीये. त्यामुळे मानाच्या पालख्या शिवशाही बस मधून पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेत. संत तुकाराम महाराज यांच्या पादुकाही पंढरपूरच्या दिशेने रवाना झाल्यात. या सोहळ्यासाठी शिवशाही बसला आकर्षक फुलांनी सजवण्यात […]

Mumbaitak
follow google news

राज्यातल्या समस्त वारकरी समुदायाचं लक्ष ज्या सोहळ्याकडे असतं तो आषाढी एकादशीचा सोहळा आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पायी पालखी सोहळ्याला परवानगी देण्यात आलेली नाहीये. त्यामुळे मानाच्या पालख्या शिवशाही बस मधून पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेत. संत तुकाराम महाराज यांच्या पादुकाही पंढरपूरच्या दिशेने रवाना झाल्यात.

हे वाचलं का?

या सोहळ्यासाठी शिवशाही बसला आकर्षक फुलांनी सजवण्यात आलं आहे. ग्यानबा तुकारामच्या जयघोषात तुकोबारायांच्या पालखीने पंढरपूरला प्रस्थान केलं. १ जुलै रोजी तुकोबांचा पालखी सोहळा मुख्य मंदिरात पार पडला होता. देहूच्या मुख्य मंदिरात गोल रिंगण, मेंढ्यांच रिंगण, अश्वाच रिंगण असे सोहळे पार पडले आहेत. हे सर्व सोहळे दरवर्षी पंढरपूरच्या दिशेने पायी वारी जाते तेव्हा पार पडत असतात. परंतु, यावर्षी देखील करोनाचं संकट असल्याने मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

आज सकाळी मुख्य मंदिरात प्रदक्षिणा घातल्यानंतर पालखी इनामदार वाड्यात टाळ मृदंगाच्या गजरात पोहचली. तिथे पादुकांची आरती करून झाल्यानंतर एसटीमध्ये पादुका विसावल्या. तुकोबांचा जयघोष करत ग्यानबा तुकारामाने परिसर दुमदुमून गेला होता. त्यानंतर एसटीमधून पादुका पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या.

    follow whatsapp