देशात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढतोय. अनेक कलांकारांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी कोरोनाच्या जाळ्यात अडकलेत. तर आता प्रसिद्ध गायक अभिजीत सावंतलाही कोरोना झाला आहे. त्याचप्रमाणे अभिनेत्री शुभांगी अत्रेचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे.
ADVERTISEMENT
अभिजीत सावंतने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिलीये. तो म्हणतो, “माझा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे इतर सर्वांनी काळजी घ्या. आणि मुख्य म्हणजे मास्क घालायला विसरू नका” अभिजीतने इंडियन आयडॉल या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमात प्रथम विजेतेपद पटकावून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती.
तर भाबीजी घर पर हैं या मालिकेतील अंगूरी भाबी म्हणजेच अभिनेत्री शुभांगी अत्रे ही कोरोनाच्या विळख्यात सापडलीये. काही दिवसांपूर्वीपासूनच या मालिकेचं शूटींग बंद ठेवण्यात आलं होतं. शुभांगी सध्या घरीच क्वारंटाईन आहे. शिवाय शुभांगीने इतरांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
बॉलिवूड अभिनेता मिलिंद सोमणची कोरोना चाचणी अखेर 14 दिवसांनंतर निगेटिव्ह आली आहे. मिलिंदने सोशल मीडियावर ही माहिती दिलीये. दरम्यान मिलिंदने क्वारंटाइनच्या काळात घेतलेल्या काढ्याची रेसीपीही खास शेअर केलीये. काही दिवसांपूर्वी अभिनेता मिलिंद सोमण कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली होती. सोशल मीडिया पोस्टद्वारे मिलिंदने याबाबत माहिती दिलेली.
ADVERTISEMENT