Abortion Pills: मुंबईत दररोज 71 महिलांना करावा लागतोय गर्भपात, कारण…

मुंबई तक

• 01:08 AM • 08 Mar 2023

मुंबईतील महिलांबद्दल एक महत्त्वाची आकडेवारी आधारित माहिती समोर आलीये. गर्भधारणा टाळण्यासाठी अवलंबले जाणारे गर्भनिरोधक उपाय निष्फळ ठरल्याचं समोर आलं आहे. यामुळे मुंबईत दररोज जवळजवळ 71 महिलांना गर्भपात करावा लागत असल्याचं समोर आलं. याबाबतची माहिती मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने आरटीआय अतंर्गत विचारलेल्या प्रश्नात दिली. मुंबई मनपाने कुटुंब नियोजनासाठी विविध उपक्रम राबवते. यामध्ये नसबंदीपासून महिलांना कॉपर टी […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

मुंबईतील महिलांबद्दल एक महत्त्वाची आकडेवारी आधारित माहिती समोर आलीये.

गर्भधारणा टाळण्यासाठी अवलंबले जाणारे गर्भनिरोधक उपाय निष्फळ ठरल्याचं समोर आलं आहे.

यामुळे मुंबईत दररोज जवळजवळ 71 महिलांना गर्भपात करावा लागत असल्याचं समोर आलं.

याबाबतची माहिती मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने आरटीआय अतंर्गत विचारलेल्या प्रश्नात दिली.

मुंबई मनपाने कुटुंब नियोजनासाठी विविध उपक्रम राबवते. यामध्ये नसबंदीपासून महिलांना कॉपर टी बसवण्यापर्यंतचा समावेश आहे.

आरटीआय कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी मुंबई मनपाच्या कुटुंब कल्याण विभागाकडून गर्भपाताची माहिती मागवली असता, हे स्पष्ट झालं.

गेल्या वर्षात मुंबईत 30 हजार 92 गर्भपात केले गेले. त्यापैकी 87 टक्क्यांहून अधिक गर्भपातात कारण गर्भनिरोधक निकामी ठरल्याचं आहे.

इतर प्रकरणांमध्ये आईच्या जीवाला धोका, बलात्कार आणि अबनॉर्मल मुल होण्याच्या भीतीमुळे करण्यात आले.

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

    follow whatsapp