मुंबई : वांद्रे-वरळी सीलिंकवर भीषण अपघात झाला. पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास चार गाड्या दुर्घटनाग्रस्त झाल्याची माहिती आहे. यात एका रुग्णवाहिकेचाही समावेश आहे. अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून 6 जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर नायर आणि लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृत आणि जखमींची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, आधी एका वाहनाचा अपघात झाला होता, त्यातील जखमींना उपचारादाखल नेण्यासाठी रुग्णवाहिका बोलविण्यात आली होती. रुग्णवाहिकेतून जखमींना घेऊन जाणापूर्वीच आणखी तीन गाड्या अपघातग्रस्त गाडी आणि रुग्णवाहिकेवर जाऊन आदळल्या. या भीषण अपघातानंतर सीलिंकवर एकच गोंधळ उडाला आहे. अपघाताचा पुढील तपास पोलीस करत असून खबरदारी म्हणून वांद्रे-वरळी रस्ता बंद करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT