उल्हासनगर: उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे किरकोळ वादातून एका महिलेची भिंतीवर डोकं आपटून हत्या करण्यात आली आहे. यात मुली समोरच आरोपींनी तिच्या आईची हत्या केल्याचं आता समोर आलं आहे.
ADVERTISEMENT
सुकन्या आव्हाड असं हत्या झालेल्या महिलेचं नाव असून सुकन्या यांच्या पतीचे 7 वर्षांपूर्वीच निधन झाले होते. सध्या सुकन्या मुलांसोबत चिंचपाडा परिसरात राहत होत्या. काही दिवसांपासून सुकन्या यांचं अनिल भातसोडे याच्यासोबत परिचय वाढला होता. दोघे लग्नही करणार असल्याने त्यांच्या घरी अनिलच येणं जाणं वाढलं होतं.
अनिल हा अनेकदा सुकन्याकडे पैशांची मागणी करत असल्याने दोघांमध्ये वाद होत होते. 12 तारखेला अनिल आणि सुकन्या यांच्यात किरकोळ वाद झाला. या वेळी अनिलने सुकन्याला बेदम मारहाण करत तिचे डोकं भिंतीवर आपटलं. हा सगळा प्रकार सुकन्या यांच्या मुलीने पाहिला.
मुलगी घराबाहेर मोबाइलमध्ये व्हिडिओ गेम खेळत असताना, तिला घरातून आईच्या ओरडण्याचा आवाज आला. तेव्हा घरात डोकावून पाहिले असता अनिल हा तिच्या आईचे डोके भिंतीवर आपटत होता. यात सुकन्या गंभीर जखमी झाल्याने तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारांआधीच तिचा मृत्यू झाला.
दुसरीकडे सुकन्या हिची हत्या करून आरोपी अनिल हा फरार झाला. आता सुकन्या यांची मुलगी आकांक्षा हिच्या तक्रारीवरून विठ्ठलवाडी पोलिसांनी आरोपी अनिल भातसोडे याच्या विरोधात हत्याचा गुन्हा दाखल केला असून आरोपीच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आले आहे.
मृत सुकन्या ही 17 वर्षीय मुलीसोबत विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंचपाडा गावात राहात होती. तिच्या पतीचे 7 वर्षांपूर्वी निधन झाले होते. उदरर्निवाहसाठी दोघी माय लेकी केटरर्सचा व्यवसाय करत होत्या.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला व भातसोडे हे काही वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनमध्ये होते. मात्र, काही कारणास्तव ते मागील तीन महिन्यापासून वेगळे राहत असले, तरी आरोपी हा मृत महिलेला बाहेर बोलावून घेऊन जात होता.
लिव्ह इन रिलेशनशीपचा हव्यास… मुलीने जन्मदात्या आईचा गळाच चिरला!
दरम्यान, आज सकाळी महिलेचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला असून आरोपी अनिल भातसोडे याचा शोध घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी दिली.
ADVERTISEMENT