Laal Singh Chaddha या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर #BANLaal Singh Chaddha ट्रेंडचा चांगलाच फटका बसला. आमिर खानचा हा सिनेमा दणकून आपटला. अशात हा सिनेमा कुठलंही OTT APP घ्यायला तयार नाही अशाही बातम्या येत होत्या. अशात लालसिंह चढ्ढाला ओटीटी बायर मिळाला आहे अशी सूत्रांची माहिती आहे.
ADVERTISEMENT
अशी चर्चा आहे की हा सिनेमा नेटफ्लिक्सने विकत घेतला आहे. मात्र त्यासाठीची डील कमी पैशांमध्ये झाल्याचंही समजतं आहे. मात्र ओटीटीवर हा सिनेमा येण्यासाठी वाट बघावी लागणार आहे. आठ आठवड्यात हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलिज होणार आहे.
करीना कपूरने लालसिंग चढ्ढा सिनेमाच्या वादावर सोडलं मौन! म्हणाली, “अशा ट्रेंडकडे…”
लालसिंह चढ्ढाच्या ओटीटी डीलबाबत मोठी बातमी
रिपोर्टनुसार आमिर खानच्या लालसिंह चढ्ढा या सिनेमाला अखेर नेटफ्लिक्सच्या रूपाने बायर मिळाला आहे. नेटफ्लिक्सने ही डील कमी पैशांमध्ये केली आहे. हा सिनेमा १५० कोटींना विकला जाईल अशी चर्चा होती. मात्र तसं झालं नाही. त्यानंतर ही किंमत ८०-९० कोटींमध्ये फिक्स होईल अशीही चर्चा होती. सिनेमा सपाटून आपटल्यानंतर नेटफ्लिक्सने ही डील ५० कोटींमध्ये केल्याची चर्चा आहे. विशेष बाब म्हणजे हा सिनेमा ज्यावर आधारित आहे तो फॉरेस्ट गम्प हा सिनेमाही नेटफ्लिक्सवरच आहे.
नेटफ्लिक्सने विकत घेतला लालसिंह चढ्ढा सिनेमा
ही डील झाल्याची बातमी येताच आता त्या चर्चाही समोर आल्या आहेत ज्यामध्ये नेटफ्लिक्सने ही डील रद्द केल्याचं कळत होतं. सिनेमाचे मेकर्स त्यानंतर Voot सारख्या अॅपचा पर्याय शोधत होते. बॉलिवूड हंगामाने मात्र आता ही बातमी दिली आहे की नेटफ्लिक्स आणि सिनेमाचे निर्माते यांच्यात पुन्हा चर्चा झाली आणि कमी पैशांमध्ये ही डील झाली. आमिर खानला ग्लोबल रिच या सिनेमामुळे मिळेल. तसंच नेटफ्लिक्सलाही फायदा होईल या अनुषंगाने दुसऱ्या बैठकीत चर्चा झाल्याचं समजतं आहे.
बॉलिवूड अभिनेता आमिर खान याचा लालसिंह चढ्ढा हा सिनेमा ११ ऑगस्टला रिलिज झाला. या सिनेमाची चांगलीच चर्चा सुरू होती. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून बॉयकॉट लालसिंह चढ्ढा हा ट्रेंड फिरत होता. त्याचा मोठा फटका सिनेमाला बसला. त्यामुळे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दणकून आपटला. म्हणावा तसा व्यवसाय हा सिनेमा करू शकला नाही. अशात आता नेटफ्लिक्स या ओटीटी अॅपवर आठ आठवड्यात हा सिनेमा रिलिज होईल अशी माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT