जॅकलिन फर्नांडीसला ‘ईडी’ने मुंबई विमानतळावरच रोखलं; थोड्या वेळाने दिली जाण्याची परवानगी

मुंबई तक

• 03:01 AM • 06 Dec 2021

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसरला मुंबई विमानतळावर रविवारी रात्री अडवण्यात आलं. तिला देश सोडण्यास मनाई करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. 200 कोटींच्या वसुलीच्या प्रकरणात जॅकलिनचं नाव ईडीच्या आरोपपत्रात नमूद कऱण्यात आलं आहे. त्यामुळे तिला देश सोडता येणार नाही असं सांगण्यात आलं. मात्र, थोडावेळ ताब्यात घेतल्यानंतर ईडीने जॅकलिनला जाण्याची परवानगी दिली. ईडीने बजावलेल्या लुक आऊट सर्क्युलरच्या आधारे मुंबई आंतरराष्ट्रीय […]

Mumbaitak
follow google news

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसरला मुंबई विमानतळावर रविवारी रात्री अडवण्यात आलं. तिला देश सोडण्यास मनाई करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. 200 कोटींच्या वसुलीच्या प्रकरणात जॅकलिनचं नाव ईडीच्या आरोपपत्रात नमूद कऱण्यात आलं आहे. त्यामुळे तिला देश सोडता येणार नाही असं सांगण्यात आलं. मात्र, थोडावेळ ताब्यात घेतल्यानंतर ईडीने जॅकलिनला जाण्याची परवानगी दिली.

हे वाचलं का?

ईडीने बजावलेल्या लुक आऊट सर्क्युलरच्या आधारे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अडवण्यात आलं होतं. सुकेश चंद्रशेखरने मागितलेल्या 200 कोटींच्या खंडणी प्रकरणात जॅकलिनची ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्यामुळे तिला देश सोडण्यास मनाई करण्यात आली आहे, असं ईडीच्या सूत्रांनी इंडिया टुडेला सांगितलं.

सूत्रांनी इंडिया टुडेला सांगितले की, जॅकलिन परदेशात जाण्यासाठी विमानात बसण्याची प्रक्रिया पूर्ण करत असताना अधिकार्‍यांनी तिला थांबवले आणि लुक-आउट परिपत्रकाची माहिती दिली. जॅकलिन फर्नांडिसला ताब्यात घेतल्याची माहिती विमानतळ अधिकाऱ्यांनी अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर जॅकलिनला अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं. मात्र, थोड्या वेळानंतर तिला सोडण्यात आलं. त्यानंतर जॅकलिन परदेशी रवाना झाली.

ईडी किंवा कायद्याशी संबंधित कोणतीही यंत्रणा ज्यावेळी संशयित आरोपीच्या विरोधात लुक आऊट सर्क्युलर जारी करते त्यावेळी त्या संशयिताला हवाई मार्गाने, जलमार्गाने किंवा रस्त्याने देशाबाहेर जाण्यास संमती नसते. सूत्रांनी इंडिया टुडेला सांगितले की, जॅकलिनची लवकरच दिल्लीत चौकशी केली जाईल. यापूर्वी, ईडीने किमान दोनदा तिचा जबाब नोंदवला आहे. सुकेश चंद्रशेखर विरुद्धच्या अलीकडील आरोपपत्रात, ईडीने जॅकलीन फर्नांडिसच्या सहभागाचा उल्लेख केला आहे.

सुकेशने तुरुंगात असताना जॅकलिनला 10 कोटी रुपयांहून अधिक रूपयांच्या भेटवस्तू पाठवल्याची माहिती इंडिया टुडेला मिळाली आहे. सुकेशने जामिनावर बाहेर असताना जॅकलिनसाठी मुंबई ते चेन्नईसाठी चार्टर्ड फ्लाइटही बुक केल्याचे सूत्रांनी सांगितलं आहे. सुकेशने एका व्यावसायिकाच्या पत्नीकडून उकळलेली मोठी रक्कम जॅकलीन फर्नांडिसकडे वळवल्याचाही ईडीला संशय आहे.

जॅकलिनने असे सांगितले की ती पीडित आहे आणि तपासकर्त्यांना मी पूर्ण सहकार्य करणार आहे. दरम्यान तिहार तुरुंगात असताना सुकेश चंद्रशेखरने एका व्यावसायिकाच्या पत्नीकडून 200 कोटी रुपये उकळल्याचा आरोप आहे. एका उच्चपदस्थ सरकारी अधिकारी असल्याचे भासवून पीडितेला फसवणूक करण्यासाठी सॉफ्टवेअरचा वापर करून एका वर्षात कोट्यवधी रुपये वसूल केली आणि तिच्या पतीविरुद्ध दाखल कायदेशीर खटल्यांमध्ये मदत करू असे आश्वासन दिले.

    follow whatsapp