ADVERTISEMENT
स्वरा भास्करच्या लग्नाचे सेलिब्रेशन अजूनही सुरू आहे. एकामागून एक तिचे लूक्स समोर येत आहेत. आता स्वराच्या निरोपाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
स्वरा भास्करने समाजवादी पार्टीचे युवा नेते फहाद अहमदसोबत लग्न केले आहे. तिच्या नवीन व्हिडीओमध्ये स्वरा लाल रंगाच्या लेंहग्यात दिसून आहे.
हा व्हिडिओ तिच्या निरोपाच्या वेळेचा आहे. स्वरा दारात उभी आहे आणि रडत आहे. तिच्या डोळ्यात अश्रू आहेत.
अभिनेत्रीच्या या व्हिडीओने चाहतेही भावूक झाले. अनेकांनी या जोडप्याला नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी स्वरा आणि फहादच्या लग्नाचे रिसेप्शन पार पडले होते. यामध्ये स्वराने जबरदस्त डिझायनर लेहेंगा घातलेला दिसला.
हा रॉयल लेहेंगा पाकिस्तानी डिझायनर अली जीशानने बनवला आहे. एक सुंदर लेहेंगा पाठवल्याबद्दल स्वराने अलीचे आभारही मानले आहेत.
तिचा हा लेहेंगा फ्लाँट करत स्वराने अनेक फोटो काढले आहेत. तिचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
स्वरा भास्करने फेब्रुवारीमध्ये फहाद अहमदसोबत कोर्ट मॅरेज केलं होतं.
लग्नानंतर स्वरा भास्करने खास प्रकारचे मंगळसूत्र परिधान केले आहे.
ADVERTISEMENT