विदर्भातील अष्टविनायकापैकी एक : आदासा गणपती

मुंबई तक

• 08:24 AM • 15 Sep 2021

नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील आदासा येथे हे गणपती मंदिर आहे. अत्यंत प्राचीन असे हे मंदिर आहे. आदासा गणपती विदर्भातील अष्टविनायकापैकी एक म्हणून ओळखला जातो. या गणपतीच्या मंदिरात मूर्ती एकाच दगडात कोरलेली आहे. असं म्हटलं जातं की आज या मंदिरात दिसणारी प्रतिमा ही गणेशपुराणात वर्णन केलेल्या बारा गणपतींपैकी एक आहे. गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे, असं म्हटलं […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील आदासा येथे हे गणपती मंदिर आहे. अत्यंत प्राचीन असे हे मंदिर आहे. आदासा गणपती विदर्भातील अष्टविनायकापैकी एक म्हणून ओळखला जातो.

या गणपतीच्या मंदिरात मूर्ती एकाच दगडात कोरलेली आहे. असं म्हटलं जातं की आज या मंदिरात दिसणारी प्रतिमा ही गणेशपुराणात वर्णन केलेल्या बारा गणपतींपैकी एक आहे.

गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे, असं म्हटलं जातं आणि त्याची सोंड उजवीकडे वळते. मूर्ती दिसायला भव्य आहे. नाभीच्या खाली असलेला भाग जमिनीखाली आहे आणि वरील भाग सुमारे 6 मीटर (20 फूट) उंचीचा आहे. मूर्तीची रुंदी 3 मीटर (10 फूट) पेक्षा जास्त आहे. नोव्हेंबर आणि जानेवारीमध्ये येथे धार्मिक कार्यक्रम होतात. परंतु कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून यात्रा बंद आहे.

हेमाडपंती शैलीत बांधलेली मंदिराचा मुख्य कळस भव्य आणि उंच आहे. रचना विलक्षण असून बांधकाम मजबूत आहे. मंदिराच्या भिंती आणि कळसावर सुंदर कोरीव काम केलेलं आहे.

अशी एक आख्यायिका आहे की, जेव्हा राम आणि रावण यांच्यात झालेल्या युद्धात रावणाचा मुलगा इंद्रजितने लक्ष्मणाला आघात केला. तेव्हा हनुमानाला एक औषधी वनस्पती घेण्यासाठी मंदार पर्वतावर उड्डाण करावं लागलं. औषधी वनस्पती गोंधळ झाल्यानं हनुमानाने डोंगरच उचलला. वाटेत त्याचा एक मोठा भाग खाली पडला जो अदासा असल्याचं सांगितलं जातं.

    follow whatsapp