रिलायन्स जिओ लवकरच बजेट लॅपटॉप लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. त्याची किंमत सुमारे 15 हजार रुपये असेल. रिलायन्स जिओने याआधी स्वस्त फोनही लॉन्च केले आहेत. आता कंपनी बजेट 5G फोनसह स्वस्त लॅपटॉप JioBook लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.एका रिपोर्टनुसार, त्याची किंमत $184 (सुमारे 15 हजार रुपये) ठेवली जाईल. ही माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या सूत्राने दिली आहे.
ADVERTISEMENT
JioBook साठी पार्टनशीप केली
मुकेश अंबानींच्या कंपनीने JioBook साठी जागतिक-जायंट क्वालकॉम आणि मायक्रोसॉफ्टसोबत पार्टनरशिप केली आहे. याशिवाय कंपनी आर्म लिमिटेड आणि अनेक अॅप्सना सपोर्ट करण्यासाठी विंडोज ओएसचीही मदत घेणार आहे. सध्या ही कंपनी भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. त्याचे 420 दशलक्षाहून अधिक ग्राहक आहेत.
स्वस्त लॅपटॉप आल्यास मध्यमवर्गीयांना फायदा
मात्र, कंपनीने सध्या या लॅपटॉपबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.एका रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, हा लॅपटॉप या महिन्यापासून शाळा आणि सरकारी संस्थांसारख्या एंटरप्राइझ ग्राहकांना उपलब्ध करून दिला जाईल. त्यामुळे शाळेत विद्यार्थ्यांसाठी हा बजेट लॅपटॉप खूप फायदेशीर असणार आहे. लॉकडाऊनमुळे देशात ऑनलाईन शिक्षण रुजलं आहे. त्यामुळे अशाप्रकारचे स्वस्त लॅपटॉप मार्केटमध्ये आल्यास त्याचा फायदा मध्यमवर्गीयांना होणार आहे.
मार्चपर्यंत कंपनीची लाखो युनिट्स विकण्याची योजना आहे
हा लॅपटॉप 4G-सक्षम असेल. तर हा स्वस्त लॅपटॉप ग्राहकांसाठी पुढील तीन महिन्यांपर्यंत उपलब्ध करून दिला जाणार आहे. या सेगमेंटमध्ये या लॅपटॉपची मागणी खूप जास्त असू शकते, असे या अहवालात सांगण्यात आले आहे. गेल्या वर्षी कंपनीने स्वस्त जिओफोन लॉन्च केला होता. JioBook बाबत असे सांगण्यात आले आहे की ते लोकल मॅन्युफॅक्चरर फ्लेक्ससह तयार केले जाईल. मार्चपर्यंत कंपनीची लाखो युनिट्स विकण्याची योजना आहे.जिओ मार्केटमध्ये आणताना अंबानींनी स्वस्तातील स्मार्टफोन आणि स्वस्त डेटाप्लॅन आणलं होतं. त्यामुळं रिलायन्स जिओचं जाळं देशातील प्रत्येक कोपऱ्यात पोहचलं. त्यानंतर आता स्वस्तातील लॅपटॉपमुळं अनेकांची सोय होईल. आता कंपनी हा स्वस्तातला जिओबुक कधीपर्यंत लॉन्च करते, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
ADVERTISEMENT