ADVERTISEMENT
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याचा शनिवारी समारोप झाला. दौरा आटोपताच पंतप्रधान मोदी न्यूयॉर्कवरून भारताच्या दिशेनं रवाना झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दौऱ्यात अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस, राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची भेट घेतली.
दौऱ्याच्या अखेरीस पंतप्रधान मोदींनी संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेलाही संबोधित केलं.
या दौऱ्यातील आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमेरिकेनं भारताला परत केलेला ऐतिहासिक ठेवा.
अमेरिकेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तब्बल १५७ पुरातन मूर्त्या आणि कलाकृती परत केल्या आहेत. अनेक शतकांपूर्वीच्या या कलाकृती असून, तस्करीच्या मार्गाने त्या अमेरिकत नेण्यात आलेल्या होत्या.
या सर्व पुरातन मूर्त्या आणि कलाकृती इसवी सन ११ ते इसवी सन १४ या कालावधीतील आहेत.
यातील ४५ वस्तू या इसवी सन पूर्व कालखंडातील आहेत.
अमेरिकनं परत केलेल्या पुरातन कलाकृतीपैकी ७१ कलाकृती या सांस्कृतिक वारसाशी संबंधित आहेत.
उर्वरित मूर्त्या या भारतातील धर्मांशी संबंधित आहेत. यात ६० मूर्ती हिंदू धर्माच्या आहेत. तर १६ बौद्ध आणि ९ जैन धर्माशी संबंधित आहेत.
या सर्व मूर्त्या आणि कलाकृती आजही अतिशय सुरेख दिसतात. त्यांची कलाकुसर आणि त्यातील सौंदर्य आजच्या स्थितीतही कायम आहे.
ADVERTISEMENT