एमआयएम (MIM) पक्षाचे खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jalil ) यांच्यावर पुन्हा एकदा चक्क नोटांचा वर्षाव करण्यात आला आहे. औरंगाबाद आमखास मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या कव्वालीच्या कार्यक्रमात जलील यांच्यावर अक्षरशः नोटांचा पाऊस पडत होता. तर जलील यांच्यावर पैसे उधळण्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
ADVERTISEMENT
नेमका काय होता कार्यक्रम?
खासदार इम्तियाज जलील यांच्यावर कव्वालीच्या कार्यक्रमात नोटांचा वर्षाव करण्यात आला. खासदार जलील यांच्यावर आमखास मैदानावर गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या स्पर्धा भरवल्या जात आहेत तसंच विविध कार्यक्रमांचं आयोजनही केलं जातं आहे. शुक्रवारी याच मैदानावर इम्तियाज जलील यांनी कव्वालीचा कार्यक्रम आयोजित केला होता. कव्वाली सुरू असताना इम्तियाज जलील या ठिकाणी आले तेव्हा त्यांच्या समर्थकांकडून नोटांचा पाऊस पाडण्यात आला.
इम्तियाज जलील यांच्याबाबत नाराजी
इम्तियाज जलील यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. सोशल मीडियावर नाराजीचा सूरही उमटतो आहे. अतिवृष्टी झाल्यानंतर एकदाही शेतकऱ्यांच्या बांधावर न जाता त्यांच्या समस्या जाणून न घेणाऱ्या इम्तियाज जलील यांच्यावर पैसे उधळले जात आहेत हे पाहून नाराजी व्यक्त होते आहे.
यापूर्वी डिसेंबर २०२१ मध्ये एमआयएमचे तत्कालीन औरंगाबाद जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर साजेद यांच्या भाचीचे लग्न शहरातील एका प्रसिद्ध लॉ मध्ये झालं होतं. यावेळी कव्वालीचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता. दरम्यान यावेळी आलेले जलील नरवदेवाला भेटण्यासाठी व्यासपीठावर जाताच त्यांच्यावर नोटांचा वर्षाव करण्यात आला होता. तर खुलताबाद येथे आयोजित एका कव्वालीच्या कार्यक्रमात देखील जलील यांच्यावर अशाच प्रकारे पैसे उधळले गेले होते.
ADVERTISEMENT