बच्चू कडूंचे भिडू कुणाचा करणार कार्यक्रम? शिंदे-फडणवीसांचं वाढलं टेन्शन

मुंबई तक

10 Jan 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:25 AM)

महाराष्ट्रात पुन्हा निवडणूक (maharashtra mlc election 2023) लागलीये. विधान परिषदेच्या 5 रिक्त जागांसाठी ही निवडणूक होत आहे. शिक्षक आणि पदवीधर हे उमेदवार निवडणूक देणार आहेत. त्यामुळेच या निवडणुकीत कोण कुणाला धोबीपछाड देणार, याची चर्चा सुरू असतानाच प्रहारचे आमदार बच्चू कडूंनी (bacchu kadu) एकनाथ शिंदे (eknath shinde) आणि देवेंद्र फडणवीसांचं (Devendra fadnavis) टेन्शन वाढलंय. विधान परिषद […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्रात पुन्हा निवडणूक (maharashtra mlc election 2023) लागलीये. विधान परिषदेच्या 5 रिक्त जागांसाठी ही निवडणूक होत आहे. शिक्षक आणि पदवीधर हे उमेदवार निवडणूक देणार आहेत. त्यामुळेच या निवडणुकीत कोण कुणाला धोबीपछाड देणार, याची चर्चा सुरू असतानाच प्रहारचे आमदार बच्चू कडूंनी (bacchu kadu) एकनाथ शिंदे (eknath shinde) आणि देवेंद्र फडणवीसांचं (Devendra fadnavis) टेन्शन वाढलंय. विधान परिषद निवडणुकीत बच्चू कडूंच्या प्रहार जनशक्तीने (Prahar Janshakti) उमेदवार मैदानात उतरवले आहेत.

हे वाचलं का?

भाजप, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), बाळासाहेबांची शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असे प्रमुख पक्ष आखाड्यात असताना त्यात आमदार बच्चू कडूंनीही दंड थोपटले. बच्चू कडूंच्या प्रहार जनशक्ती पक्षानंही उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतलाय. याच भूमिकेमुळे बच्चू कडूंनी थेट शिंदे-फडणवीसांना आव्हान दिल्याची चर्चा सुरू झालीये.

सध्या एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली युतीचं सरकार आहे. या सरकारला आमदार बच्चू कडू यांच्या पक्षाचा पाठिंबा आहे. दुसरीकडे होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी सुरु केलीये. असं असताना या निवडणुकीत सगळ्या जागांवर उमेदवार देणार असल्याचं बच्चू कडूंनी जाहीर केलंय. त्यामुळे भाजपचं टेन्शन वाढलंय

मंत्रिमंडळ विस्तारामुळे अपक्ष-शिंदे गटात फुसफुस! भोंडेकर स्पष्टच बोलले

विधान परिषद निवडणूक 2023 : बच्चू कडूंची प्रहार जनशक्ती मैदानात

प्रहार शिक्षक संघटना व‎ महाराष्‍ट्र इंग्रजी शाळा संस्‍था संघटनेचे मिळून पाच विभागाचे उमेदवार‎ विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी उभे राहणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत भाजप-शिंदे गटाला मित्रपक्ष असलेल्या बच्चू कडूंच्या प्रहार जनशक्तीचाच फटका बसण्याची शक्यता निर्माण झालीये. कारण प्रहारने स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानं भाजप-शिंदे युतीच्या मतांत विभाजन होणार आहे.

विधान परिषद निवडणूक : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी‎ कुठे निवडणूक होत आहे?

अमरावती पदवीधर मतदार‎संघ नाशिक पदवीधर मतदारसंघ औरंगाबाद शिक्षक‎ मतदारसंघ कोकण शिक्षक मतदारसंघ नागपूर शिक्षक मतदारसंघ विधान परिषद निवडणुकीत हे प्रहार जनशक्तीचे उमेदवार किरण चौधरी (अमरावती पदवीधर मतदार‎संघ) डॉ. संजय तायडे (औरंगाबाद शिक्षक‎ मतदारसंघ) नरेश कोंडा (कोकण शिक्षक मतदारसंघ) प्रा. सुभाष‎ जंगळे (नाशिक पदवीधर मतदारसंघ) अतुल रायकर (नागपूर शिक्षक मतदारसंघ)

Election : काँग्रेस, NCPने डाव टाकला! पण ठाकरेंचे हात रिकामाचे राहणार?

विधान परिषद निवडणुकीत बच्चू कडूंच्या पाठिशी किती ताकद?

बच्चू कडूंनी विधान परिषद निवडणुकीच्या मैदानात उडी घेतलीये, पण त्यांची खरंच तितकी ताकद आहे का? तर याचा अंदाज घेऊनच बच्चू कडू पाचही जागा लढवताहेत. बच्चू कडूंच्या पाठिशी किती संघटना ते बघा…

स्वाभिमानी शिक्षक संघटना

पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद

महात्मा फुले शिक्षक परिषद

मराठा क्रांती मोर्चा

शिक्षक‎ समन्वय संघ

जिल्हा परिषद‎ माध्यमिक शिक्षक संघ

या संघटनांनी पाठिंबा दिला असल्याची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाकडून देण्यात आलीये.

बच्चू कडूंबद्दल सांगायचं झालं तर, कडूंनी निवडणुकीत उमेदवार उतरवण्याची ही पहिली वेळ नाहीये. 2017 मध्येही अमरावती पदवीधर मतदार संघातून डॉ. दीपक धोटे यांना संधी दिली होती. मात्र त्यांचा पराभव झाला. तेव्हापासून आतापर्यंत बच्चू कडूंनी शिक्षक आणि पदवीधर मतदार संघासाठी कसून तयारी केली आहे. पाचही मतदार संघांमध्‍ये मतदार नोंदणी असो की, अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणं असो, कडूंनी परफेक्ट नियोजन केल्याचं म्हटलं जात आहे. महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये बच्चू कडूंकडे शालेय शिक्षण राज्यमंत्रीपदाचीही जबाबदारी होती. दुसरीकडे त्यांच्या संघटनांनी काही प्रश्नही शिक्षकांचे लावून धरलेले आहेत, त्यामुळे बच्चू कडू चमत्कारही दाखवू शकले नाही, तर भाजप उमेदवाराला झटका देऊ शकतात.

आता याच निवडणुकीत भाजपचे 3 उमेदवार आहेत.

कोकण विभागातून ज्ञानेश्वर म्हात्रे

अमरावतीसाठी रणजीत पाटील

मराठवाडासाठी किरण पाटील

या निवडणुकीत शिंदे गट आणि भाजपने नागपूरसह नाशिकच्या जागेवर निर्णय घेतलेला नाही.

याच निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडूनही उमेदवार जाहीर करण्यात आलेत.

कोकण विभागाकासाठी शेकापचे बाळाराम पाटील

मराठवाडा विभागासाठी राष्ट्रवादीचे विक्रम काळे

नाशिक विभागासाठी काँग्रेसचे सुधीर तांबे उमेदवार आहे.

नागपूरमध्ये शिक्षक परिषदेचे विद्यमान आमदार ना गो गाणार यांना पाठिंबा द्यायचा की स्वत:चा उमेदवार उभा करायचा याबद्दल भाजपचा निर्णय झालेला नसल्याचं म्हटलं जातंय. आता या पाच जागांवर कोण बाजी मारणार, भाजपकडून काय बदल केले जाणार, महाविकास आघाडी कशा पद्धतीने निवडणूक लढवणार आणि बच्चू कडूंचे उमेदवार कुणासाठी डोकेदुखी ठरणार, यामुळे ही निवडणूक रंजक झालीये.

    follow whatsapp