Badlapur Akshay Shinde: पोलिसांनीच धाडला अक्षय शिंदेला यमसदनी... एन्काऊंटरची Inside Story

मुंबई तक

• 11:00 PM • 23 Sep 2024

Akshay Shinde Death: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी कसा एन्काऊंटर केला याची इनसाइड स्टोरी आता समोर आली आहे.

अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरची Inside Story

अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरची Inside Story

follow google news

बातम्या हायलाइट

point

आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस चकमकीदरम्यान मृत्यू

point

अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरची Inside Story

point

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली एन्काऊंटरची माहिती

Akshay Shinde encounter: ठाणे: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा आज (23 सप्टेंबर) पोलीस चकमकीदरम्यान मृत्यू झाला. मात्र, सुरुवातीला अक्षय शिंदे याने आत्महत्या केली असं वृत्त समोर आलं होतं. मात्र, त्याचा मृत्यू आत्महत्येमुळे नाही तर पोलिसांनी झाडलेल्या गोळ्यांमुळे झाल्याचं आता समोर आलं आहे. (badlapur sexual assault case akshay shinde was attacked by the police inside story of the encounter)

हे वाचलं का?

लैंगिक अत्याचाराचा आरोपी अक्षय शिंदे याचा नेमका मृत्यू कसा झाला याबाबतची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

अक्षय शिंदेच्या मृत्यूवर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया 

'पोलिसांनी स्व-संरक्षणार्थ केली कारवाई'

'आरोपी अक्षय शिंदेची जी पहिली पत्नी होती जिने तक्रार दाखल केली होती की, लैंगिक अत्याचाराचा. याचप्रकरणी तपासासाठी आरोपीला आणण्यात येत असतानाच ही घटना घडली.'

हे ही वाचा>> Eknath Shinde : आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर, मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?

'आरोपी अक्षय शिंदे याने बंदूक हिसकावून पोलीस कर्मचारी निलेश मोरे याच्यावर गोळी झाडली. ज्यामध्ये तो जखमी झाला आहे. यासाठी पोलिसांनी स्व-संरक्षणार्थ ही कारवाई केली. अशी प्राथमिक माहिती मला मिळाली आहे. पोलीस तपास याप्रकरणी सुरू आहे.' अशी माहिती मुख्यमंत्री शिंदेंनी दिली.

'विरोधकांनी आरोपीची बाजू घेणं हे निंदाजनक'

'ज्या आरोपीने लहान बच्चूवर अन्याय केला त्यावेळेस विरोधक सांगत होते याला फाशी द्या. तेच विरोधक आता आरोपीची बाजू घेत असतील ज्याने अतिशय माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य केलं.. तर हे दुर्दैव आहे. म्हणून अशाप्रकारच्या आरोपीची बाजू घेणं हे निंदाजनक आहे. त्याचा निषेध करावा तेवढं थोडं आहे.' 

हे ही वाचा>> Badlapur News: आधी पोलिसांवर गोळीबार अन् नंतर अक्षय शिंदेचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

'विरोधी पक्षाला काही बोलायचा अधिकार आहे. एपीआय दर्जाचा पोलीस जखमी आहे. त्याचं काही देणंघेणं नाही विरोधकांना.. जे पोलीस कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून काम करतात. अशाप्रकारे पोलिसांबाबत आक्षेप घेणं हे चुकीचं आहे. विरोधी पक्षाने अशाप्रकारचं वक्तव्य करणं दुर्दैवी आहे.' असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

'माझी लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांची झोप उडाली'

'विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे त्यांची झोप उडाली आहे. ते बिथरले आहेत.. त्यांना पराभव दिसू लागला आहे. म्हणून हे सगळे उलटसुलट आरोप करत आहेत.' असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. 

गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची अक्षय शिंदे प्रकरणावर टीका

'अक्षय शिंदेने पोलिसावर गोळ्या झाडल्या, हवेत गोळ्या झाडल्या'

'त्याच्या पूर्व पत्नीने एक तक्रार केली होती लैंगिक अत्याचाराची. त्या संदर्भात चौकशी करण्याकरिता वॉरंट घेऊन त्याला चौकशीसाठी नेण्यात येत होतं. त्याने पहिल्यांदा पोलिसाची बंदूक हिसकावून गोळीबार केला. त्याने पोलिसावर गोळ्या झाडल्या, हवेत गोळ्या झाडल्या.. त्यानंतर संरक्षणार्थ पोलिसांनी गोळ्या चालवल्या.' 

'यासंदर्भात त्याला दवाखान्यात नेण्यात आलं.. अजून अधिकृत घोषणा करायची बाकी आहे. जी काही माहिती आहे त्याप्रमाणे बहुदा मृत्यू झाला असावा. त्यामुळे हे कुठलंही प्रोत्साहन देऊन झालेलं कृत्य नाही. तर एकप्रकारे पोलिसांनी स्व-संरक्षणार्थ केलेला गोळीबार आहे. ज्यामध्ये आरोपीचा मृत्यू झाला.' अशी माहिती फडणवीसांनी दिली. 

'विरोधक प्रत्येक मुद्द्यावर प्रश्न विचारतं.. हेच विरोधक आहेत जे सारखं म्हणत होते की, फाशी द्या. तेच विरोधक आता पोलिसांवर गोळ्या चालवल्या.. आता पोलीस आपलं रक्षण करणार की नाही करणार? मला असं वाटतं की, यावर वाद करणं चुकीचं आहे.' असंही उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले. 

    follow whatsapp