बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक : भाजपच्या मंगला अंगडी विजयी, काँग्रेसच्या जारकीहोळींचा पराभव

मुंबई तक

• 03:04 PM • 02 May 2021

कर्नाटकातील बेळगाव लोकसभेच्या पोट निवडणुकीत भाजपच्या उमेदवार मंगला अंगडी यांनी बाजी मारली आहे. केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर बेळगाव लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लावण्यात आली होती. काँग्रेसकडून सतीश जारकीहोळी रिंगणात होते तर महाराष्ट्र एकीकरण समितीने शुभम शेळके यांना उमेदवारी दिली होती. अखेरपर्यंत चाललेल्या अटीतटीच्या मंगला अंगडी यांनी बाजी मारली आहे. Pandharpur By-election Result: पंढरपुरात भाजपकडून […]

Mumbaitak
follow google news

कर्नाटकातील बेळगाव लोकसभेच्या पोट निवडणुकीत भाजपच्या उमेदवार मंगला अंगडी यांनी बाजी मारली आहे. केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर बेळगाव लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लावण्यात आली होती. काँग्रेसकडून सतीश जारकीहोळी रिंगणात होते तर महाराष्ट्र एकीकरण समितीने शुभम शेळके यांना उमेदवारी दिली होती. अखेरपर्यंत चाललेल्या अटीतटीच्या मंगला अंगडी यांनी बाजी मारली आहे.

हे वाचलं का?

Pandharpur By-election Result:
पंढरपुरात भाजपकडून राष्ट्रवादीचा ‘करेक्ट कार्यक्रम’, समाधान आवताडेंचा निर्णायक विजय

भाजपच्या मंगला अंगडी यांनी ५ हजार २४० मतांनी विजय मिळवला आहे. अंगडी यांनी ४ लाख ४० हजार ३२७ तर काँग्रेसच्या जारकीहोळी यांनी ४ लाख ३५ हजार ८७ मतं मिळवली. महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांनीही १ लाख १७ हजार १७४ मतं मिळवत दोन्ही उमेदवारांना चांगली लढत दिली. बेळगावची पोटनिवडणूक चांगलीच रंगली. काँग्रेसच्या जारकीहोळी यांनी अखेरपर्यंत आपली आघाडी टिकवून ठेवली होती.

परंतू अखेरच्या दोन फेऱ्यांमध्ये मंगला अंगडी यांनी आघाडी घेत चित्र पालटवलं. महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारासाठी शिवसेना नेत्यांनी ताकद लावली होती. संजय राऊत यांनी बेळगावात जाऊन शुभम शेळके यांच्यासाठी रोड शो देखील केला. परंतू शुभम शेळके मतपेटीत आपली जादू दाखवू शकले नाहीत.

बेगानी शादी मे अब्दुल्ला दीवाना ! ममतांचं कौतुक करणाऱ्या राज्यातल्या नेत्यांना फडणवीसांचा टोला

    follow whatsapp