Allu Arjun Arrest: संध्या थिएटरच्या घटनेला अल्लू अर्जुनच जबाबदार? 'त्या' लेटरने उडवली खळबळ!

Allu Arjun Arrest Latest News Update:  लाखो प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या अल्लू अर्जुनला हैदराबाद पोलिसांनी अटक केलीय. संध्या थिएटरमध्ये 4 डिसेंबरला पुष्पा 2 चित्रपटाच्या स्क्रीनिंग दरम्यान चेंगराचेंगरी झाली होती.

Allu Arjun Arrest Latest News Update

Allu Arjun Arrest Latest News Update

मुंबई तक

• 04:49 PM • 13 Dec 2024

follow google news

बातम्या हायलाइट

point

अल्लू अर्जूनला अटक का करण्यात आली?

point

'त्या' व्हायरल पत्राने सर्वांच्याच उंचावल्या भुवया

point

पत्रात नेमकं काय म्हटलंय?

Allu Arjun Arrest Latest News Update:  लाखो प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या अल्लू अर्जुनला हैदराबाद पोलिसांनी अटक केलीय. संध्या थिएटरमध्ये 4 डिसेंबरला पुष्पा 2 चित्रपटाच्या स्क्रीनिंग दरम्यान चेंगराचेंगरी झाली होती. या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला तर एल मुलगा बेशुद्ध अवस्थेत होता. याप्रकरणी पोलिसांनी अल्लू अर्जूनवर कायदेशीर कारवाई केली असून संध्या थिएटरचे प्रशासनही अडचणीत सापडल्याचं बोललं जात आहे. अशातच थिएटर मॅनेजमेंटने दावा केला आहे की, अल्लू अर्जून उपस्थित राहण्याच्या दोन दिवस आधी पोलिसांना सुरक्षा देण्याबाबत सांगण्यात आलं होतं.

हे वाचलं का?

संध्या थिएटरकडून देण्यात आलेलं 'ते' पत्र व्हायरल

हैदराबादच्या संध्या थिएटर आणि पोलीस प्रशासन यांच्यामध्ये अल्लू अर्जूनची एन्ट्री झाल्याने प्रकरण चांगलच तापलं आहे. थिएटर प्रशासनाने दावा केला आहे की, त्यांनी अभिनेत्याच्या एन्ट्रीच्या दोन दिवस आधी सुरक्षेच्या प्रश्नाबाबत पोलिसांना पत्रव्यवहार केला होता. पुष्पा 2 च्या प्रमोशन दरम्यान अल्लू अर्जून येणार असल्याची माहिती लिखित स्वरुपात दिल्याचं थिएटर प्रशासनाचं म्हणणं आहे. तरीही पोलिसांनी कोणत्याही प्रकारची ठोस पावले उचलली नाहीत. तर दुसरीकडे पोलिसांनी म्हटलंय की, अभिनेता (अल्लू अर्जुन) येणार असल्याची कोणतीही पूर्व सूचना आम्हाला देण्यात आली नव्हती. थिएटर प्रशासनाने त्यांच्या बाजूने पुरावे समोर केलं आहेत, त्यामुळे पोलिसांच्या कामकाजाबाबत सवाल उपस्थित करण्यात आले आहेत.

हे ही वाचा >> Today Gold Rate: 24 तासातच सोनं गडगडलं? मुंबईत 22 अन् 24 कॅरेट गोल्डचा आजचा भाव काय?

संध्या थिएटरमध्ये 4 डिसेंबरला पुष्पा 2 चित्रपटाची स्पेशल स्क्रीनिंग ठेवण्यात आली होती. अल्लू अर्जुन या स्क्रीनिंगला उपस्थित राहिला होता. त्यामुळे अर्जुनच्या जबरा चाहत्यांनी थिएटरच्या बाहेर मोठी गर्दी केली होती. लोकांच्या गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ही करावा लागला होता. या चाहत्यांना भेटण्यासाठी अल्लू अर्जुन त्या ठिकाणी पोहोचला होता. अभिनेत्याला पाहण्यासाठी लोक धावले आणि त्याचदरम्यान चेंगराचेंगरी झाली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. लोकांच्या गर्दीत एक लहान मुलगा बेशुद्ध झाला होता आणि 35 वर्षीय महिलेचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली.

हे ही वाचा >> Today Gold Rate: 24 तासातच सोनं गडगडलं? मुंबईत 22 अन् 24 कॅरेट गोल्डचा आजचा भाव काय?

    follow whatsapp