मुंबई: महानायक अमिताभ बच्चन यांना विठुरायाच्या भक्तीचा लळा लागला आहे. मूळच्या गंगा किनाऱ्यावाल्या या महानायकला भीमा तीरी कटेवर कर ठेवून उभा असणाऱ्या कोट्यवधी वारकरी भाविकांचे श्रद्धा स्थान असणाऱ्या विठ्ठलाच्या भक्तीत अनेक वर्षांपासून लिन झाल्याचे पाहायला मिळत आहे. बिग बी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मातेचे फोटो ट्विट करून विठ्ठलाप्रती भक्ती जागृत केली. या पूर्वी ही त्यांनी प्रत्येक एकादशीला मुंबईच्या मंदिरांमधील श्री विठ्ठल-रुक्मिणीचे फोटो शेअर करून प्रार्थना केली आहे.
ADVERTISEMENT
पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणीला दररोज पारंपरिक दागिन्यांचा साज चढवून सुंदर पोशाख परिधान करून नित्य पूजा, काकडा आरती नित्य पूजेनंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सुंदर पोशाखातील फोटो सोशल मीडियावर अपलोड केले जातात. हेच अपलोड केलेले सुंदर फोटो पाहून रविवारी बिग बी अमिताभ बच्चन यांनी मंदिर समितीने ट्विटरवर टाकलेल्या फोटोला रिट्विट करून मी विठ्ठलाचा भक्त असल्याचे दाखवून दिले.
शेकडो वर्षांनी आला ‘हा’ दुर्मिळ योग, पाहा विठुरायाचं लोभसवाणं रुप
ट्विट केलेल्या फोटोला राज्यातूनच नव्हे तर देशभरातील विविध सेलिब्रिटींनी या फोटोला रिट्विट केले आहे. दरवर्षी पंढरपुरात साजऱ्या होणाऱ्या आषाढी एकादशीला अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर विठ्ठलाचा फोटो शेअर करत आषाढी एकादशीच्या मराठी भाषेतून शुभेच्छा देतात. तसेच नवीन वर्षाच्या सुरुवातीला व अनेक सणांच्या वेळी देखीलबिग बी हे विठ्ठलाचे फोटो शेअर करीत शुभेच्छा देत असल्याचं पाहायला मिळालं आहे.
काही दिवसांपूर्वी कोरोनाची सर्व परिस्थिती सुधारावी आणि देशात पुन्हा चांगले दिवस यावेत यासाठी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी विठ्ठलाकडे प्रार्थना केली होती. नुकतंच बिग बींनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे . ‘ प्रार्थनाएँ हैं प्रबल, अमंगल हो कुशल मंगल; विठ्ठल कृपा रहे सब पर, परस्पर परस्पर परस्पर ‘
अक्षय तृतीयेनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हापूस आंब्यांची आरास
अनेकांचं श्रध्दास्थान असणाऱ्या विठ्ठलाचे भक्त बिग बीसुद्धा आहेत. अमिताभ यांनी शेअर केलेल्या या पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. यावेळी एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले आहे की, ‘कोरोना कालचक्रामुळे देश घाबरला आहे. पण देवाची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहिल.’
दरम्यान, बिग बी अमिताभ बच्चन यांनी ट्विट केलेले विठ्ठलाचे फोटो आता चांगलेच व्हायरल देखील होऊ लागले आहेत.
ADVERTISEMENT