बंगळुरु: राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये (RSS) आज (20 मार्च) एक मोठा बदल करण्यात आला आहे. तो म्हणजे आरएसएसच्या सरकार्यवाह पदी दत्तात्रय होसबळे यांची निवड करण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भैय्याजी जोशी यांच्या जागी त्यांची निवड करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
बंगळुरुमध्ये आरएसएसच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. सरकार्यवाह हे संघातील दुसऱ्या क्रमांकाचं पद आहे. ज्यासाठी आज सुरेश (भैय्याजी) जोशी यांच्याऐवजी दत्तात्रय होसबळे यांची निवड करण्यात आली. 2009 पासून दत्तात्रेय होसबळे यांच्याकडे सह सरकार्यवाह जबाबदारी सोपवण्यात आली होती. आरएसएसमध्ये सरकार्यवाह हे अत्यंत महत्त्वाचं पद मानलं जातं. दरम्यान, या फेरबदलामुळे आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघात अनेक बदल घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आरएसएसमध्ये दर 3 वर्षांनी कार्यकारिणीची निवड केली जाते. यावेळी सरकार्यवाहपासून खालच्या कार्यकारिणीची निवड केली जाते. यावेळी फक्त सरसंघचालक पदासाठी निवड केली जात नाही. बंगळुरुत सुरु असलेल्या निवड प्रक्रियेत आज होसबळे यांची सरकार्यवाह पदी बिनविरोध निवड करण्यात आली.
फडणवीस भल्या सकाळी RSS मुख्यालयात भागवतांच्या भेटीला; चर्चाना उधाण
दरम्यान, 2009 पासून भैय्याजी जोशी हे सरकार्यवाह पदाची जबाबदारी सांभाळत होते. गेल्या 12 वर्षापासून त्यांच्यावर ही जबाबदारी होती. पण मागील 4 वर्षापासून त्यांनी हे पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, तरीही अनेक वर्ष त्यांच्यावरच सहकार्यवाह पदाची जबाबदार सोपवण्यात येत होती. अखेर आज दत्तात्रय होसबळे यांची सहकार्यवाहपदी नियुक्ती करत भैय्याजी जोशी यांना जबाबदारीतून मोकळं करण्यात आलं आहे.
RSSचे नवे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांचा अल्प परिचय
-
दत्तात्रय होसबळे यांचा जन्म 1 डिसेंबर 1954 रोजी कर्नाटकमधील होसबळेमध्ये झाला होता.
-
त्यांनी आपलं शालेय शिक्षण आपल्या जन्मगावीच पूर्ण केले.
-
आपले महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी ते बेंगळुरु येथे गेले आणि प्रसिद्ध राष्ट्रीय महाविद्यालयात प्रवेश घेतला.
-
पुढे होसबाळे यांनी बंगळुरु विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर शिक्षण घेतले.
-
याच दरम्यान, ते पहिल्यांदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जो़डले गेले.
-
1968 रोजी त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रवेश केला होता. तर ते 1972 साली विद्यार्थी संघटना ABVPशी जोडले गेले.
-
1974 साली त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं प्रथम संघ शिक्षण पूर्ण केलं. तर 1978 साली ते संघाचे प्रचारक झाले.
-
बंगळुरुमधून त्यांनी प्रचारक म्हणून सुरुवात केली होती.
-
कन्नड, हिंदी, तामिळ, इंग्रजी आणि संस्कृत भाषेवर होसबळे यांचं प्रभुत्व
-
होसबाळे हे तीन वर्षांच्या मुदतीसाठी आरएसएसचे सरकार्यवाह असतील. सरकार्यवाह पदाची निवडणूक तीन वर्षांतून एकदा होते.
ADVERTISEMENT