भाजपच्या मंडळ अध्यक्षाची हत्या; नाशिकमध्ये 4 दिवसांत 3 खून

मुंबई तक

• 08:08 AM • 26 Nov 2021

राज्यातील काही महत्त्वाच्या शहरांपैकी एक असलेल्या नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटना वाढताना दिसत आहेत. मागील 4 दिवसांत 3 हत्या झाल्याच्या घटना घडल्या आहेत. शहरातील सातपूर परिसरात भाजपा मंडळ अध्यक्ष अमोल इथे यांची अज्ञात कारणावरून हत्या करण्यात आली. यामुळे नाशिक शहरात खळबळ उडाली आहे. सातपूर परिसरातील भाजप मंडळ अध्यक्ष अमोल इथे हे आज सकाळी कामगार […]

Mumbaitak
follow google news

राज्यातील काही महत्त्वाच्या शहरांपैकी एक असलेल्या नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटना वाढताना दिसत आहेत. मागील 4 दिवसांत 3 हत्या झाल्याच्या घटना घडल्या आहेत. शहरातील सातपूर परिसरात भाजपा मंडळ अध्यक्ष अमोल इथे यांची अज्ञात कारणावरून हत्या करण्यात आली. यामुळे नाशिक शहरात खळबळ उडाली आहे.

हे वाचलं का?

सातपूर परिसरातील भाजप मंडळ अध्यक्ष अमोल इथे हे आज सकाळी कामगार युनियनच्या कामाकरीता सातपूर एमआयडीसीमध्ये गेले होते. सध्या या कंपनीमध्ये युनियन स्थापन करण्यावरून दोन वेगवेगळ्या युनियनचे वाद होते. या वादातून मागील आठ दिवसांपासून या ठिकाणी वातावरण दूषित झालेलं होतं. या ठिकाणी युनियन कायम राहावी म्हणून प्रयत्न करत होते, परंतु त्याला कंपनीतील काही कामगारांचा तीव्र विरोध होता.

Nashik Crime : दारुच्या नशेत असताना अट्टल गुन्हेगाराची हत्या, टोळीयुद्धातून प्रकार घडल्याचा अंदाज

या अंतर्गत वादात तोडगा निघावा म्हणून शुक्रवारी सकाळी इथे या ठिकाणी गेले होते. त्यावेळी अंतर्गत वाद झाला आणि त्या वादातून धारदार शस्त्राने अमोल इथे यांच्यावर वार करण्यात आले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने त्यांना सकाळी आठ वाजेच्या सुमारास शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. अमोल इथे हे सातपूर भाजप मंडळाचे अध्यक्ष होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नाशिक शहर पोलीस झोन दोनचे पोलीस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक पोलीस आयुक्त व पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरु करण्यात आला आहे. दरम्यान, या हत्येनंतर भाजप आमदार, भाजप शहराध्यक्ष आणि कार्यकर्त्यांनी कारवाईची मागणी करत सातपूर पोलीस स्टेशनसमोर आंदोलन केलं.

नाशिक : महिला सरपंचाने विष प्राशन करत संपवलं आयुष्य; तिघांना पोलिसांनी केलं अटक

मागील चार दिवसांमध्ये शहरात हत्येची तिसरी घटना घडली आहे. शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल भाजपचे शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘काही लोकं कामगारांना वेठीस धरून विनाकारण युनियनच्या वाद निर्माण करत आहे आणि त्यातून आमच्या कार्यकर्त्याची हत्या झाली, असं त्यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp