त्या क्रूझ पार्टीवर भाजप नेत्याच्या मेहुण्याला सोडून देण्यात आलं असा आरोप आज नवाब मलिक यांनी केला आहे. एवढंच नाही तर एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचे कॉल रेकॉर्ड तपासण्यात यावेत असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. समीर वानखेडे मीडियाला हे सांगत आहेत की आठ ते दहा लोक होते. मात्र प्रत्यक्षात अकरा जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. मुंबई पोलिसांनाही ही माहिती सकाळपर्यंत मिळाली होती की एकूण 11 जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. मात्र बातम्या अशा आल्या की आठ ते दहा लोकांना ताब्यात घेण्यात आलं. या प्रकरणात तिघांना सोडून देण्यात आलं असाही आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
ADVERTISEMENT
ऋषभ सचदेवा, प्रतीक गाबा, आमीर फर्निचरवाला या तिघांना सोडून देण्यात आलं. ऋषभ सचदेवा, प्रतीक गाबा, आमीर फर्निचरवाला या तिघांनाही ताब्यात घेण्यात आलं होतं. एका चॅनलने या तिघांचे व्हीडिओही चालवले होते. या तिघांना कसं सोडून देण्यात आलं त्याचे व्हीडिओही नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत दाखवले. या तिघांनाही ताब्यात घेण्यात आलं होतं मात्र सोडून देण्यात आलं. ऋषभ सचदेवाचे वडील, काका तिथे आले होते. त्यांच्यासोबत या तिघांना सोडून देण्यात आलं असा गौप्यस्फोट आज नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला.
Drugs Case : नवाब मलिक यांच्या आरोपांना भाजपच्या मनिष भानुशालींनी दिलं उत्तर, म्हणाले..
ऋषभ सचदेवा हा भाजप युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित कंबोज यांचे मेहुणे आहेत. मोहित कंबोज यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळाला आहे. तसंच देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या इतर दिग्गजांसोबतही मोहित कंबोज यांचे फोटो आहे. ऋषभ सचदेवाला ताब्यात घेण्यात आलं होतं त्यानंतर दोन तासांनी सोडून देण्यात आलं. त्यावेळी तिघांना सोडून देण्यात आलं. जे इतर दोघे आहेत प्रतीक गाबा आणि आमीर फर्निचरवाला या दोघांनी बोलवल्यामुळेच आर्यन खान तिथे गेला होता.1300 लोकांची क्षमता असलेल्या जहाजावर छापा मारला. त्यातल्या 11 लोकांना तुम्ही ताब्यात घेतलं. त्यानंतर या सगळ्यांना NCB च्या कार्यालयात नेण्यात आलं. या तिघांना सोडून देण्यासाठी आदेश कुणी दिले याचं उत्तर NCB ने द्यावी. आमची माहिती अशी आहे की दिल्ली ते महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांनी ऋषभ सचदेवा, आमीर फर्निचरवाला आणि प्रतीक गाबा या तिघांना सोडण्याचे आदेश दिले. समीर वानखेडे यांनी याबाबत खुलासा करावा असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT