गोवा विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपने पुन्हा एकदा सरकार स्थापनेच्या दिशेने वाटचाल केली आहे. काँग्रेसची कडवी झुंज मोडून काढत भाजपने पुन्हा एकदा जनतेचा विश्वास मिळवण्यात यश मिळवलं आहे. या विजयानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेना नेते संजय राऊतांवर खोचक शब्दांत टीका केली आहे.
ADVERTISEMENT
सर्वज्ञानींच्या झंजावाती दौऱ्याचा परिणाम – शिवसेनेच्या गोवा, युपी उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होताना दिसत आहे. झुकेगा नही…जब तक महाराष्ट्र में इसी तरह शिवसेना का सुपडा साफ़ नहीं करतां -इति सर्वज्ञानी असं ट्विट करत चित्रा वाघ यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे.
याचसोबत एकटे देवेंद्र फडणवीस काय करणार असं विचारणाऱ्यांना चित्रा वाघ यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं आहे.
चित्रा वाघ यांच्यासोबत भाजप आमदार नितेश राणे यांनीही आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
गोव्यात यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेकडून आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि अन्य नेत्यांनी तळ ठोकला होता. अनेक मतदारसंघात आदित्य ठाकरेंनी सभाही घेतल्या होत्या. परंतू मतदारांना शिवसेनेने प्रतिसाद दिलेला दिसत नाहीये. निवडणुक आयोगाच्या संकेतस्थळावर दिलेल्या आकडेवारीनुसार गोव्यात शिवसेनेला 0.18 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 1.11 टक्के मत मिळाली आहेत. या दोन्ही पक्षांना मिळालेल्या मतांपेक्षा गोव्यात लोकांनी NOTA ला जास्त मत दिली आहेत. गोव्यात NOTA ला मिळालेली मत 1.12 टक्के इतकी आहेत.
ADVERTISEMENT