राजकारण म्हटलं की प्रत्येकालाच सत्ता हवी असते, मात्र आत्मचिंतन केलं असतं तर आत्मक्लेश करायची वेळ आली नसती असं म्हणत भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. एवढंच नाही तर आता शिवसेना माझी आहे असं म्हणू का? असाही खोचक प्रश्न त्यांनी विचारला आहे. आता जे एकत्र आले आहेत ते कायमस्वरूपी एकत्र राहतील असं दिसतं आहे असंही उदयनराजेंनी म्हटलं आहे. आता उद्धव ठाकरे यावर उत्तर देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
उदयनराजेंनी दीपक केसरकर यांची घेतली भेट
उदयनराजे भोसले यांनी आज कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांची पुण्यात भेट घेतली. दीपक केसरकर आज पुणे दौरा करून साताऱ्यात जाणार आहेत. त्यानंतर कोल्हापूरमध्ये मुक्काम करून उद्याही ते कोल्हापूरमध्ये असतील. त्यानंतर ते सिंधुदुर्गला रवाना होणार आहेत. मात्र आज प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
मग शिवसेना माझी आहे असं म्हणू का? असंही उदयनराजेंनी विचारलं आहे
जेव्हा लोक एका विचाराने एकत्र येतात तेव्हा त्यांना एकत्र ठेवण्यासाठी कोणतीही ताकद वापरावी लागत नाही. आता जे एकत्र आले आहेत ते कायमस्वरूपी एकत्र राहतील असं दिसतं आहे असंही उदयनराजे यांनी म्हटलं आहे. शिवसेना ठाकरेंची की शिंदे गटाची असा प्रश्न विचारला असता संपूर्ण महाराष्ट्र माझा आहे मग मी शिवसेना माझी आहे असं म्हणू का? असा प्रश्न उदयनराजेंनी विचारला.
लोकशाहीत संपूर्ण महाराष्ट्र हा लोकांचा आहे. लोकांच्या माध्यमातून कुठल्याही कुठल्या पक्षातले आमच्यासारखे लोकप्रतिनिधी मग ते आमदार असो किंवा खासदार निवडून जातात. त्यामुळे छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र हा लोकांचा महाराष्ट्र आहे असंही उदयनराजेंनी म्हटलं आहे.
इतर राजांमध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये इतकाच फरक होता की ते स्वतःला राजा म्हणायचे नाहीत. मात्र जनतेचा राजा, रयतेचा राजा अशी त्यांची ओळख होती असंही उदयनराजेनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT