सलग तिसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या विधानसभेत मुसंडी मारत हॅटट्रीकच्या दिशेने आगेकूच केलेल्या तृणमूल काँग्रेसने भाजपला धक्का दिला आहे. ममता बॅनर्जींच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी भाजपने पश्चिम बंगालमध्ये मोठी फौज उतरवली होती. परंतू पश्चिम बंगालमधील जनेतेने पुन्हा एकदा ममता बॅनर्जींच्या पारड्यात आपलं मत टाकलं आहे. बंगालमध्ये ममता दीदींच्या विजयात मोलाची भूमिका निभावणाऱ्या राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी बंगालमधील निकालांवर महत्वाची प्रतिक्रीया दिली आहे.
ADVERTISEMENT
तृणमूल काँग्रेसमध्ये जी लोकं पक्षासाठी डोईजड झाली होती. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे, गुंडागर्दीचे आरोप होते अशा लोकांना भाजपने आपल्या पक्षात स्थान दिलं आणि या लोकांच्या जोरावर ते विजयाचं स्वप्न पाहत होते. मीडियानेही ही लोकं सोडून गेल्यानंतर तृणमूल काँग्रेसला भगदाड, पक्ष संपला…अशा बातम्या चालवल्या. पण प्रत्यक्षात ममता दीदींच्या पक्षातला हा कचरा होता तो भाजपने उचलला. ही लोकं सोडून गेल्याचा तृणमूल काँग्रेसला फटका बसेल असा अंदाज सर्वांनी वर्तवला होता परंतू तसं झालं नाही.” प्रशांत किशोर इंडिया टुडेशी बोलत होते.
पश्चिम बंगालचे निकाल येण्याआधी प्रशात किशोर यांनी इंडिया टुडेशी बोलत असताना भाजपने बंगालमध्ये तीन आकडी संख्या पार केली तर मी आता जे काम करतोय ते सोडून देईन असं वक्तव्य केलं. बंगालमध्ये दुपारपर्यंतचे कल पाहता प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी ठरत असल्याचं चित्र दिसत आहे. तृणमूल काँग्रेसने २०१९ च्या निवडणूकीत केलेल्या चुका यंदा करायच्या नाहीत हे ठरवून रणनिती आखली ज्याचा फायदा पक्षाला झाल्याचंही किशोर यांनी सांगितलं.
West Bengal Election Counting : भाजपच्या गद्दारीला लोकांनी चपराक दिली आहे – शिवसेना
भाजप बंगालमध्ये ममता दीदींना कडवी टक्कर देत असता प्रशांत किशोर यांनी राज्यात ममता दीदींचच सरकार येणार असं सांगितलं होतं. हा अंदाज आम्ही रस्त्यावर उतरुन अनेक गोष्टींचा आढावा घेऊन मगच वर्तवत होतो असं प्रशांत भुषण म्हणाले. भाजप या निवडणुकीत जुन्या गृहितकांवरच अवलंबून राहिलं, ज्याचा फटका त्यांना बसला. २०१९ मध्ये ममता दीदींकडून लोकसभा निवडणूकीत ज्या काही चूका झाल्या त्या चूका तृणमूल पुन्हा करेल असं भाजपला वाटत होतं…परंतू प्रत्यक्षात असं काहीच झालं नाही. पश्चिम बंगाल सरकारने लोकपयोगी अनेक योजना राबवल्या, ज्याचं रिपोर्टींग मीडियात झालं नाही. परंतू आम्ही ते लोकांपर्यंत पोहचवण्यात यशस्वी ठरलो, असं प्रशांत किशोर म्हणाले.
ADVERTISEMENT