कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसतेय. बाॅलिवूडवर देखील सध्या कोरोनाचं संकट आहे. तर आता अभिनेते परेश रावल यांनाहीकोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. परेश रावल यांनी काही दिवसांपूर्वी कोरोना प्रतिबंधक लस घेतली होती त्यानंतर आता त्यांचाकोरोना चाचणीचा अहवाल पाॅझिटीव्ह आला आहे.
ADVERTISEMENT
परेश रावल यांनी स्वत: ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. ते ट्विटमध्ये म्हणतात, “दुर्देवाने माझी कोरोना चाचणी पाॅझिटीव्ह आली आहे. गेल्या १०दिवसांपासून जे माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी स्वत:ची चाचणी करून घ्यावी.”
दरम्यान काही दिवसांपूर्वी परेश रावल यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला होता. लस घेतानाचा फोटो देखील त्यांनी सोशलमीडियावर अपलोड केला होता. त्यावेळी त्यांनी नर्सेस, डाॅक्टर तसंच फ्रंटलाईन वर्कर्सचे आभारही मानले होते.
नुकतंच अभिनेता मिलिंद सोमण यालाही कोरोनाची लागण झाली होती. यापूर्वी मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तसंच आर माधवनला हीकोरोनाची बाधा झाली आहे.
ADVERTISEMENT