बॉलिवूडमधून एक धक्कादायक बातमी आली आहे. अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला करण्यात आला आहे. रात्री 2 वाजता घरात घुसलेल्या चोरट्याने सैफ अली खानवर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्याच्या शरीरावर 2-3 वेळा हल्ले झाले आहेत. सध्या हा अभिनेता मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल आहे. हा हल्ला कोणी आणि का केला याचा शोध पोलीस घेत आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> मोठी कारवाई सुरू, फडणवीसांनी फास आवळला.. आरोपींचा बाजार उठणार?
हल्ल्याच्या वेळी कुटुंबातील इतर सदस्य कुठे होते याबद्दल सध्या कोणतीही माहिती उपलब्ध नाही. पण करिश्मा कपूरने 9 तासांपूर्वी इंस्टा स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली होती. तिने बहीण करीना कपूर, मैत्रीण रिया आणि सोनम कपूरसोबत पार्टी केली. तिघींनीही एकत्र जेवण केलं. करीनाने तिच्या अकाउंटवरुन बहीण करिश्माची ही पोस्ट पुन्हा शेअर केली आहे. तसंच, सैफवर हल्ला झाला तेव्हा करीना तिच्या गर्ल गँगसोबत होती की, घरी पोहोचली होती याबद्दल कोणतीही माहिती नाही.
मुंबई पोलिसांनी काय म्हटले?
सैफ अली खानवरील हल्ल्याबाबत मुंबई पोलिसांनी सांगितले की, एका अज्ञात व्यक्तीने अभिनेत्याच्या घरात प्रवेश केला. यानंतर सैफ आणि घुसखोर यांच्यात हाणामारी झाली. यावेळी त्याने सैफ अली खानवर चाकूने हल्ला केला. या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे.
ADVERTISEMENT
