रशिया-युक्रेनमधील संघर्ष नव्या टप्प्यावर पोहोचला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी बंडखोरांच्या नियंत्रणाखाली असलेल्या पूर्व युक्रेनकडील दोनेत्स्क आणि लुहान्सक यांना स्वंतत्र प्रांत म्हणून घोषित केलं असून, त्यामुळे तणाव वाढला आहे. या निर्णयानंतर जगभरातून प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ब्रिटनने मोठा निर्णय घेत रशियाच्या ५ बँका आणि ३ नागरिकांवर बंदी घातली आहे.
ADVERTISEMENT
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दोन स्वंतत्र प्रांत म्हणून मान्यता दिल्यानंतर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी रशिया-युक्रेन संघर्षावर बोलताना सांगितलं की, “पुतीन यांच्याकडून चालल्या जाणाऱ्या चालीसाठी स्वतःला तयार करावं लागेल. जर युद्ध झालं तर ब्रिटनमधील ४४ मिलियन पुरुष, महिला आणि मुलाचं लक्ष्य फक्त युद्ध लढणं हेच असेल,” असं बोरिस जॉन्सन म्हणाले.
बोरिस जॉन्सन यांच्याबरोबरच ब्रिटनचे संरक्षण सचिव बेन वॉलेस यांनीही रशियाच्या लष्कराला गंभीर इशारा दिला आहे. रशियन लष्कराकडून काही केलं गेलं, तर त्याचे गंभीर परिणाम उमटतील. रशियाने युक्रेनमध्ये सैन्य हलवण्यात सुरूवात केली आहे. या पार्श्वभूमीवर वॉलेस यांनी म्हटलं आहे की, जर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, तर रशियन सैन्याला गंभीर परिणाम भोगावे लागतील,” असं ते म्हणाले.
युक्रेनच्या एका जवानाचा मृत्यू
रशियाने दोन प्रांतांना राज्य म्हणून घोषित केल्यानंतर आता पूर्व युक्रेनच्या सीमा भागात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. रशियन संसदेच्या वरिष्ठ सभागृहाने राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना देशाबाहेर लष्काराचा वापर करण्यास परवानगी दिली आहे. त्यानंतर काही लष्करी घडामोडी घडताना दिसत आहे. दरम्यान, युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेल्या पूर्व युक्रेन भागात युक्रेनच्या एका जवानाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तर ६ जण जखमी झाल्याचं युक्रेन लष्कराने म्हटलं आहे.
जर्मनीने पाईपलाईन परियोजना रोखली
ब्रिटनने रशियाच्या ५ बँकांवर बंदी घातली असून, ३ अब्जाधीश असलेल्या नागरिकांवर बंदी घातली असतानाच जर्मनीने रशियाच्या नॉर्ड स्ट्रीम-२ गॅस पाईपलाईन रोखली आहे. रशियाची पाईपलाईन बंद करण्यात आल्याची माहिती जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्ज यांनी दिली.
ADVERTISEMENT