दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना घराजवळ मिळणार लस, सरकारकडून अद्यापही ‘Door to Door’ लसीकरणाची शिफारस नाहीच!

मुंबई तक

• 02:57 AM • 28 May 2021

नवी दिल्ली: वयोवृद्ध आणि दिव्यांग नागरिकांचे कोरोना लसीकरण अधिक सक्षम व्हावे यासाठी केंद्र सरकारने नव्या गाइडलाईन्स जारी ( vaccination guidelines) केल्या आहेत. ज्यामध्ये 60 वर्षांवरील व्यक्ती आणि दिव्यांग नागरिक यांच्यासाठी निअर टू होम कोव्हिड व्हॅक्सिन सेंटर (NHCVC)असावं असं म्हटलं आहे. म्हणजेच अशा नागरिकांसाठी त्यांच्या अगदी घराजवळ असलेल्या केंद्रावर त्यांना लस मिळावी यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी […]

Mumbaitak
follow google news

नवी दिल्ली: वयोवृद्ध आणि दिव्यांग नागरिकांचे कोरोना लसीकरण अधिक सक्षम व्हावे यासाठी केंद्र सरकारने नव्या गाइडलाईन्स जारी ( vaccination guidelines) केल्या आहेत. ज्यामध्ये 60 वर्षांवरील व्यक्ती आणि दिव्यांग नागरिक यांच्यासाठी निअर टू होम कोव्हिड व्हॅक्सिन सेंटर (NHCVC)असावं असं म्हटलं आहे. म्हणजेच अशा नागरिकांसाठी त्यांच्या अगदी घराजवळ असलेल्या केंद्रावर त्यांना लस मिळावी यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. जेणेकरुन या नागरिकांना लसीकरणादरम्यान, फार त्रास होणार नाही. मात्र, असं असलं तरीही सरकारने अद्यापही अशा नागरिकांसाठी घरोघरी (Door to Door) जाऊन लसीकरण करण्याची कोणत्याही प्रकारची शिफारस केलेली नाही.

हे वाचलं का?

खरं तर वयोवृद्ध आणि दिव्यांग नागरिकांचे लसीकरण हे घरोघरी जाऊन करता येईल का? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला काही दिवसांपूर्वीच विचारला होता. ज्यावर मुंबई महापालिकेने स्पष्ट केलं होतं की, केंद्र सरकारकडून त्यासंबंधी गाईडलाइन्स जारी होताच ही प्रक्रिया सुरु केली जाईल.

Door to Door Vaccination चा विचार करा, मुंबई हायकोर्टाचे केंद्रीय समितीला आदेश

मात्र, असं असताना अद्यापही केंद्र सरकारने घरोघरी जाऊन लसीकरणाबाबतची कोणतीही शिफारस न केल्याचं आता समोर आलं आहे. नुकत्यात जारी केलेल्या गाईडलाइननुसार त्यांनी ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी त्यांच्या घराजवळील लसीकरण केंद्रावर लस देण्याचे निर्देश दिले आहेत. वयोवृद्ध आणि दिव्यांग नागरिकांसाठी घराजवळ लसीकरण करण्यात यावं अशी शिफारस केंद्रीय मंत्रालयाच्या एका तांत्रिक तज्ज्ञ समितीने (NEGVAC) केली आहे.

तांत्रिक तज्ज्ञ समितीने केलेल्या शिफारसीत असं म्हटलं गेलं आहे की, निअर टू होम कोव्हिड व्हॅक्सिन सेंटर (NHCVC)लवचिक आणि लोककेंद्रित पध्दतीचे अनुसरण करेल. ज्यामुळे कोरोना लसीकरण केंद्रे ही घराच्या जवळ येतील. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग लोकांना विचारात घेऊन असा निर्णय घेण्यात आला आहे.

ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग नागरिकांच्या चालण्या-फिरण्यात बऱ्याचदा अडचणी येत असतात ही गोष्ट लक्षात घेऊन आता केंद्र सरकारने अशा नागरिकांसाठी घराजवळ लसीकरणाची सोय उपलब्ध करुन देणार असल्याचं म्हटलं असलं तरीही घरोघरी जाऊन अशा नागरिकांचे लसीकरण केल्यास त्यांना अधिक दिलासा मिळू शकतो असं मत अनेकांनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Door to Door Vaccination : हे सर्व पब्लिसिटीसाठी सुरु होतं का? BMC च्या पवित्र्यावर हायकोर्ट संतापलं

वयोवृद्ध आणि दिव्यांगासाठी कुठे सुरु केली जाणार नवे लसीकरण केंद्र?

NHCVC अंतर्गत सरकार आता हे, गट गृहनिर्माण संस्था, पंचायत घर, आरडब्ल्यूए केंद्र, शाळेच्या इमारती इत्यादी ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु करणार आहे. अशा ठिकाणी 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व नागरिकांना ज्यांना अद्याप कोरोना लस मिळालेली नाही किंवा ज्यांचा दुसरा डोस बाकी आहे अशा आणि दिव्यांग नागरिकांचं इथे लसीकरण केलं जाणार आहे.

NHCVC अंतर्गत सुरु करण्यात आलेल्या लसीकरण केंद्रांवर फक्त ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनाच जाऊन लस घेता येणार आहे. इतर सर्व वयोगटातील लोकांना सध्या जिथे लसीकरण सुरु आहे त्याच केंद्रांवर जाऊन लस घ्यावी लागणार आहे.

    follow whatsapp