१० मार्चला चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे एका मोटारसायकचा अपघात झाला होता, ज्यात चालकाला आपले प्राण गमवावे लागले. परंतू पोलीस तपासात हा अपघात नसून त्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. मृत चालक रामेश्वर निषादच्या पत्नीने विवाहबाह्य संबंधातून आपल्या प्रियकराच्या साथीने पतीची हत्या केल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे.
ADVERTISEMENT
रामेश्वर निषादच्या अपघाताची बातमी त्याचा मित्र सुरज सोनकरने पोलिसांना दिली होती. बल्लारपूर-राजुरा मार्गावरील पुलावरुन जात असताना समोरुन येणाऱ्या गाडीचा प्रकाश डोळ्यात गेल्यामुळे राजेश्वरचं गाडीवरचं संतुलन बिघडलं आणि तो गाडीसकट पुलाखाली पडल्याची माहिती सुरजने पोलिसांना दिली होती.
नशेत 8 वर्षांच्या बहिणीवर भावाकडून बलात्काराचा प्रयत्न, वडिलांनी केली मुलाची हत्या
पोलिसांनी या घटनेचा तपास सुरुवात केल्यानंतर आजुबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. चौकशीदरम्यान हा अपघात घडण्याआधी सुरज आणि रामेश्वर यांनी एका ढाब्यावर जेवण करुन दारु प्यायल्याचं पोलिसांना कळलं. एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांना सुरजची भूमिका संशयास्पद आढळून आली. रामेश्वरसोबत बसलेला असताना सुरज न जेवता वारंवार कोणाशीतरी फोनवर बोलायला उठून जात होता. यानंतर पोलिसांनी सुरजला चौकशीसाठी ताब्यात घेतलं असता त्याने घडलेल्या गुन्ह्याची कबुली दिली.
दुर्दैवी ! वीजेचा धक्का लागून बहिण-भावाचा मृत्यू, बीडमधली घटना
सुरजचे मृत रामेश्वरच्या पत्नीसोबत विवाहबाह्य संबंध होते. यातूनच रामेश्वरची हत्या करुन तो अपघात असल्याचं भासवण्यात आलं होतं. या कामासाठी सुरजने आपला मित्र अभिजीत पांडेला १५ हजार रुपये देत हत्येच्या कटात सहभागी करुन घेतलं. सुरज, अभिजीत आणि मृत रामेश्वरच्या पत्नीने एकत्र बसून हत्येचा कट रचला. ठरलेल्या प्लॅन प्रमाणे रामेश्वरला धाब्यावर नेऊन जेवण आणि दारु प्यायल्यानंतर वर्धा नदीत त्याचं तोंड बुडवून हत्या करण्यात आली.
यानंतर रामेश्वरचा मृतदेह वाहत्या पाण्यात फेकून देत मोटारसायकल फेकून देत अपघाताच बनाव रचण्यात आला. परंतू पोलीस तपासात आरोपींच्या जबाबातली विसंगती, CDR रेकॉर्ड आणि सीसीटीव्हीच्या आधारावर पोलिसांनी या प्रकरणात मृत रामेश्वरच्या पतीसह तिचा प्रियकर सुरज आणि मित्र अभिजीतला अटक केली आहे.
वर्धा : सात विद्यार्थ्यांनी जीव गमावलेल्या ‘त्या’ ठिकाणीच विचित्र अपघात; दोघे ठार, तीन गंभीर
ADVERTISEMENT