संक्रांतीच्या सगळ्यांना शुभेच्छा देत असताना गोडव्यासाठी तिळगुळाची वाट न बघता लोकांसाठी काम करणं जास्त आवश्यक आहे. ते केलं तर लोक आपल्या पाठिशी राहतील असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
ADVERTISEMENT
आज मकरसंक्रात आहे त्यानिमित्ताने व्हॉट्स अॅप चॅट बोटचं उद्घाटन मुंबई महापालिकेने केलं. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.
आणखी काय म्हणाले मुख्यमंत्री?
आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणारा दिवस आहे. क्रांतीचा दिवस आहे. अशा दिवशी म्हणजेच संक्रांतीच्या दिवशी मी आपणा सर्वांना शुभेच्छा देतो. मात्र एक सांगू इच्छितो की शासकीय, प्रशासकीय कारभाराबाबत जेव्हा लोक बोलतात तेव्हा तिळगुळ दिल्याशिवाय काम होत नाही असा लोकांचा समज आहे. आपण लोकांचा हा समज मोडून काढला पाहिजे.
माझी महापालिका, माझं सरकार ही लोकांची भावना हवी. त्यांच्याशी संवाद सुलभपणे झाला पाहिजे असं नागरिकांना नेहमी वाटतं ही सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्याचा आजचा दिवस आहे. Whats App Chat Boat द्वारे आपण ही सुविधा उपलब्ध करून देत आहोत. मतं मागताना झुकलेले खांदे, नंतर ताठ होतात. पण ज्यांना लोकांसाठी काम करायचं असतं ते नेहमीच विनम्र असतात. आपली मुंबई, मुंबई महापालिका ही देशातली क्रमांक एकची महापालिका आहे. या महापालिकेने जनतेला 80 हून जास्त सुविधा घरबसल्या दिल्या आहेत असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
मुंबई महानगरपालिकेद्वारे देण्यात येणाऱ्या विविध ८० पेक्षा अधिक सेवा-सुविधांची माहिती नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर ८९९९-२२-८९९९ या व्हॉट्सअप क्रमांकाद्वारे अत्यंत सहजपणे उपलब्ध होणार आहेत.
उद्धव ठाकरे सरकार आणि नरेंद्र मोदी सरकार मधील नवीन वादावर अजित पवार यांचं उत्तर
याप्रसंगी वस्त्रोद्योग मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री अस्लम शेख, पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, मुंबईतील सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी व मनपा पदाधिकारी, तसेच महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबालसिंह चहल,अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे आणि व्हॉटस् ॲपचे संचालक (सार्वजनिक धोरणे) शिवनाथ ठुकराल आदी मान्यवर दूरदृश्य प्रणाली (व्हिडिओ कॉन्फरन्स) द्वारे याप्रसंगी उपस्थित होते.
इक्बालसिंह चहल यांच्या मनोगतातील मुद्दे
आज अतिशय चांगला उपक्रम सुरु होत आहे. मागील काही महिन्यांसाठी यासाठी खुप मेहनत घेण्यात होती. आज या सुविधेमुळे ८० पेक्षा अधिक सेवा सुविधा नागरिकांना हातातील मोबाईलवर मिळतील, काही सेकंदात नागरिकांच्या प्रश्नाचे निवारण होईल. देशातला असा हा पहिलाच उपक्रम.
कोविड युद्ध लढतांना आय.टीच्या सुविधा खुप महत्वाच्या
नागरिकांना घरी बसून गणपती परवाना, लायसन फी, वॉर्ड नंबरची माहिती मिळणे, वॉर्ड ऑफीसरचे नाव व इतर प्रश्न त्यांना या व्हॉटसअप चॅटद्वारे सुटण्यास मदत होईल
मागील दोन वर्षापासून कोविडशी लढतांना व्हॉटसअपची भूमिका महत्वाची. समुपदेशकांचा ग्रुप, वॉर्ड ऑफीसरचा ग्रुप, कोविड योद्ध्यांचा ग्रुप असे अनेक ग्रुप करून आपण कोविडशी नेटाने लढा दिला.
नागरिकांना ८० सेवा सुविधांचा लाभ घरी बसून मिळणे ही निश्चित कौतूकास्पद. देशात असा उपक्रम सुरु करणारी बहृन्मुंबई महानगरपालिका पहिली महापलिका
ही माहिती देतांना महापालिकेच्या व व्हॉटसअप टीमच्या लोकांनी अचूक व परिपूर्ण माहिती मिळेल याची काळजी घ्यावी
ADVERTISEMENT