भाजप नेत्या पंजा मुंडे सुप्रिया सुळेंबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या बंडातात्या कराडकर यांच्या विरोधात बीडच्या पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ज्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी बंडातात्या कराडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा म्हणून ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. बंडातात्या कराडकर यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरू ठेवणार असा इशाराही भाजप कार्यकर्त्यांनी दिला आहे.
ADVERTISEMENT
बंडातात्या कराडकर यांनी गुरूवारी दंडवत आंदोलन करून सरकारच्या किराणा दुकानात वाईन विक्रीच्या निर्णयाचा निषेध केला. यावेळी झालेल्या भाषणादरम्यान बंडातात्यांनी सुप्रिया सुळे रस्त्यावर दारू पिऊन पडतात. पंकजा मुंडे दारू पितात असा आरोप केला. सगळ्याच नेत्यांची मुलं दारू पितात माझ्याकडे पुरावे आहेत असंही त्यांनी म्हटलं होतं. यावरून प्रचंड वाद निर्माण झाल्यानंतर बंडातात्या कराडांनी माफी मागितली आहे.
आज काय म्हणाले बंडातात्या कराडकर?
‘ज्यांनी माझ्यावर आक्षेप घेतला आहे त्यांच्याशी मी प्रत्यक्ष फोनवर बोललो आहे. माझं चुकलं असेल तर मी क्षमा मागण्यास तयार आहोत. आपल्या तोंडून काही चुकीचं असेल तर क्षमा मागण्यात कमीपणा नाही’ असं बंडातात्या कराडकर यांनी म्हटलं आहे. पंकजा मुंडे आणि सुप्रिया सुळे या दोघींबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी बंडातात्या कराडकर यांनी उल्लेख केल्याने पंकजा मुंडे यांचे समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते यांनी बंडातात्या कराडकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर माझं चुकलं म्हणत बंडातात्यांनी विषय संपवा असं म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले होते बंडातात्या?
‘सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे दारू पिऊन नाचतात. सुप्रियाताई दाऊ पिऊन रस्त्यावर पडल्याचे फोटो ढिगाने मिळतील तुम्हाला. खासदार व्हायच्या आधीचे त्यांचे फोटो बघा. राजकारणात यायच्या आधी त्या दारू पिऊन पडत होत्या. सुप्रिया सुळेंनी सांगावं की बंडातात्या खोटं बोलतोय. सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे या दारू पिऊन नाच करतात. पतंगराव कदमांचा एक मुलगा कसा मेला? दारूच्या नादातून कसा गेला जरा शोधा. माझा पत्रकारांना प्रश्न आहे की कुठल्या पुढाऱ्याचा मुलगा पित नाही असं तुम्हाला माहित असेल तर मला सांगा. कऱ्हाडचे बाळासाहेब आमदार त्यांचा मुलगा दारू पितो की नाही? सगळ्यांची नावं सांगू का? मी सांगू शकतो’ असं वक्तव्य बंडातात्या कराडकर यांनी केलं होतं. त्यानंतर त्यांच्या वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध होतो आहे.
ADVERTISEMENT