लसीकरणाबाबत अदर पूनावालांनी दिली आणखी एक गुड न्यूज!

मुंबई तक

• 09:37 AM • 27 Mar 2021

एकीकडे महाराष्ट्रात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. देशातही काही राज्यांमध्ये कोरोना रूग्णांमध्ये वाढ होते आहे. मात्र चिंतेची बाब ठरते आहे ती महाराष्ट्रासाठी. अशात सीरम इन्स्टिट्युटचे अदर पूनावाला यांनी लसीकरणाबाबत एक गुड न्यूज दिली आहे. नोव्हाव्हॅक्स आणि सीरम इन्स्टिट्युट यांच्या साथीने कोव्होव्हॅक्सच्या चाचण्या भारतात सुरू झाल्या आहेत. ही लस नोव्हाव्हॅक्स आणि सीरम यांच्यातर्फे तयार करण्यात येते आहे. […]

Mumbaitak
follow google news

एकीकडे महाराष्ट्रात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. देशातही काही राज्यांमध्ये कोरोना रूग्णांमध्ये वाढ होते आहे. मात्र चिंतेची बाब ठरते आहे ती महाराष्ट्रासाठी. अशात सीरम इन्स्टिट्युटचे अदर पूनावाला यांनी लसीकरणाबाबत एक गुड न्यूज दिली आहे. नोव्हाव्हॅक्स आणि सीरम इन्स्टिट्युट यांच्या साथीने कोव्होव्हॅक्सच्या चाचण्या भारतात सुरू झाल्या आहेत. ही लस नोव्हाव्हॅक्स आणि सीरम यांच्यातर्फे तयार करण्यात येते आहे. कोरोना व्हायरसमध्ये जे अफ्रिकन आणि यु.के. व्हेरिएंट आढळलं आहे त्याविरोधात ही लस परिणामकारक आहे. ही लस कोरोनाशी लढण्यात जवळपास ८९ टक्के यशस्वी होईल असं दिसतं आहे.

हे वाचलं का?

सीरम इन्स्टिट्यट ऑफ इंडिया ही जगातली सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. या कंपनीने ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी सोबत विकसित केलेली कोव्हिशिल्डची लस ही सध्या भारतात दिली जाते आहे . लसींचा तुटवडा होण्याची कोणतीही शक्यता नाही असंही कंपनीने स्पष्ट केलं आहे. भारतातील लसीकरण सध्या योग्य दिशेने सुरू आहे. अशात सीरमच्या दुसऱ्या लसीच्या चाचण्या भारतात सुरू होणं ही बाब नक्कीच महत्त्वाची आहे. गुरुवारी पुण्यातील रूग्णालयात या नव्या लसीच्या चाचण्या सुरू झाल्या आहेत.

‘१ एप्रिलपासून ४५ पेक्षा जास्त वय असलेल्या सगळ्यांना कोरोना प्रतिबंधक लस मिळणार’

मंगळवारीच केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी एक महत्त्वाची घोषणा केली. ४५ वर्षांवरील सगळ्यांना लस देण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सगळ्यांना लस देण्यात येणार आहे. त्याआधी सीरम इन्स्टि्युटच्या दुसऱ्या लसीचं टेस्टिंग सुरू होणं ही महत्त्वाची बाब आहे.

    follow whatsapp