भिवंडीत स्फोटकांसह तिघे अटकेत, 1000 जिलेटीन आणि डीटोनेटर जप्त

मुंबई तक

• 02:04 AM • 02 Feb 2022

विक्रांत चौहान, प्रतिनिधी, ठाणे भिवंडीत स्फोटकांसह तिघांना अटक करण्यात आली आहे. या तिघांकडून पोलिसांनी 1000 जिलेटीन आणि डीटोनेटर जप्त केले आहेत. भिवंडी या ठिकाणी ठाणे क्राईम ब्रांचने ही कारवाई केली आहे. हे तिन्ही आरोपी पालघरचे आहेत. हे तिन्ही आरोपी इको या कारने भिवंडीला चालले होते. त्यांच्या कारमध्ये 1000 डिटोनेटर आणि जिलेटीन कांड्या होत्या. भिवंडीत जाऊन […]

Mumbaitak
follow google news

विक्रांत चौहान, प्रतिनिधी, ठाणे

हे वाचलं का?

भिवंडीत स्फोटकांसह तिघांना अटक करण्यात आली आहे. या तिघांकडून पोलिसांनी 1000 जिलेटीन आणि डीटोनेटर जप्त केले आहेत. भिवंडी या ठिकाणी ठाणे क्राईम ब्रांचने ही कारवाई केली आहे. हे तिन्ही आरोपी पालघरचे आहेत. हे तिन्ही आरोपी इको या कारने भिवंडीला चालले होते. त्यांच्या कारमध्ये 1000 डिटोनेटर आणि जिलेटीन कांड्या होत्या. भिवंडीत जाऊन ते कुणाला तरी हे सगळं विकणार होते.

स्फोटकांचा एवढा मोठा साठा ते भिवंडीत का घेऊन चालले होते? याबाबत आता पोलीस चौकशी करत आहेत. अल्पेश, पंकज आणि समीर अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावं आहेत.

भिवंडी गुन्हे शाखेतील पोलीस पथकाने दुपारी 3 वाजता नदीनाका, पोलीस चौकीसमोर सापळा लावून मारूती इको कार क्रमांक MH-04/FZ-9200 या कारला थांबवून तपासणी केली. यावेळी गाडीत असलेले संशयित अल्पेश उर्फ बाल्या हिराजी पाटील, पंकज अच्छेलाल चौहान, समीर उर्फ सम्या रामचंद्र वेडगा यांना ताब्यात घेतले.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांना खबऱ्याकडून गुप्त माहिती मिळाली होती. एका मारूती इको कारमधून प्रतिबंधीत जिलेटीन व डिटोनेटर हे विक्री करण्याकरीता येणार असल्याची माहिती मिळाली गायकवाड यांना मिळाली होती. भिवंडी गुन्हे शाखेतील पोलीस पथकाने दुपारी 3 वाजता नदीनाका, पोलीस चौकीसमोर सापळा लावून मारूती इको कार क्रमांक MH-04/FZ-9200 या कारला थांबवून तपासणी केली. यावेळी गाडीत असलेले संशयित अल्पेश उर्फ बाल्या हिराजी पाटील, पंकज अच्छेलाल चौहान, समीर उर्फ सम्या रामचंद्र वेडगा यांना ताब्यात घेतले. पंचांसमक्ष गाडीची तपासणी केली असता 5 बॉक्समध्ये एकूण 1000 नग जिलेटिन कांड्या, 1000 नग डिटोनेटर जप्त केले. पोलीस पथकाने तिघांना ताब्यात घेत कारसह एकूण 4 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

बेकायदेशीर स्फोटकांची बॉम्बशोधक व नाशक पथक ठाणे यांच्या मदतीने तपासणी करुन सदरची स्फोटके सुरक्षितरित्या जप्त करण्यात आली आहेत. सदर स्फोटके आरोपी चोरी करुन विक्रीसाठी नेत असल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांनी पुढील कारवाई करीत ताब्यात घेतलेल्या इसमांविरूध्द निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींविरोधात कलम 286 सह भारताचा स्फोटक पदार्थ अधिनियम 1908 चे कलम 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    follow whatsapp