मी सर्वांना दहीहंडीच्या आणि गोपाळ काल्याच्या शुभेच्छा देतो. आमच्या सरकारने म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दहीहंडीला खेळाचा दर्जा दिला आहे. गोविंदांची सुरक्षा कशी राहिल याचीही हमी घेतली. आज राजकारणाचा विषय नको. मात्र एवढंच सांगतो देशात मोदीजींच्या नेतृत्त्वात भ्रष्टाचाराची हंडी फोडायला सुरूवात झाली आहे. मुंबई महापालिकेतली भ्रष्टाचाराची हंडी फोडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतल्या वरळीत ही प्रतिक्रिया दिली आहे.
ADVERTISEMENT
नेमकं काय म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
आमच्या सरकारने गोविंदाला साहसी खेळाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे गोविंदामध्ये उत्साह पाहण्यास मिळतो आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भ्रष्टाचाराची हंडी फोडण्यास सुरूवात झाली आहे. आम्हीदेखील मुंबई महापालिकेतल्या भ्रष्टाचाराची हंडी फोडणार आणि मलई गरीबांना वाटणार आहोत असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईतल्या वरळी भागात जे जांबोरी मैदान आहे तिथे देवेंद्र फडणवीस आले होते. या मैदानातच देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं.
आदित्य ठाकरे यांचा वरळी हा मतदार संघ आहे. या वरळीतूनच आदित्य ठाकरे निवडून आले आहेत. अशात आज दहीहंडीच्या निमित्ताने या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली आणि मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची हंडी फोडणार असल्याचं जाहीर केलं. राज्यात २१ जूनला एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राजकीय भूकंप झाला. त्यानंतर महाराष्ट्रात सत्ताबदल झाला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आहेत आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज मुंबईतल्या वरळीत आले होते. जांबोरी मैदानात दहीहंडी आयोजित करण्यात आली होती. या ठिकाणी दहीहंडीचा उत्साह पाहण्यास मिळत होता. या ठिकाणी गोविंदांचा उत्साह पाहण्यासारखा होता. देवेंद्र फडणवीस यांनी या मैदानाला भेट दिली.
ADVERTISEMENT