शर्टलेस रणवीर आणि ओलीचिंब दीपिका! दोघांचा लिपलॉक फोटो व्हायरल

मुंबई तक

• 02:50 AM • 12 Feb 2022

बॉलिवूड अॅक्टर रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांची जोडी दीपवीर म्हणून ओळखली जाते. शुक्रवारी दीपिकाचा गहराइया हा सिनेमा अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झाला आहे. यात दीपिकाच्या अभिनयाचं कौतुक होतं आहे. अशात आता दीपिका आणि रणवीर या दोघांचा एक लिपलॉक फोटो व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर हे दोघे चांगलेच सक्रिय असतात. हे दोघे एकत्र असतात तेव्हा त्यांना […]

Mumbaitak
follow google news

बॉलिवूड अॅक्टर रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांची जोडी दीपवीर म्हणून ओळखली जाते. शुक्रवारी दीपिकाचा गहराइया हा सिनेमा अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झाला आहे. यात दीपिकाच्या अभिनयाचं कौतुक होतं आहे. अशात आता दीपिका आणि रणवीर या दोघांचा एक लिपलॉक फोटो व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर हे दोघे चांगलेच सक्रिय असतात. हे दोघे एकत्र असतात तेव्हा त्यांना पाहून प्रेक्षकही सुखावतात.

हे वाचलं का?

आता रणवीर सिंगने दीपिकासोबत लिपलॉक करतानाचा फोटो पोस्ट करत तिच्या गहराइया सिनेमाचं कौतुक केलं आहे. रणवीरने इंस्टाग्रामवर त्याची पत्नी दीपिका पदुकोणला किस करतानाचा हा फोटो शेअर केला आहे. रणवीर शर्टलेस आहे तर दीपिका ओली चिंब. या दोघांचा लिपलॉक फोटो रणवीरने शेअर करताच तो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. लोकांनी या फोटोवर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव केला आहे. समुद्र किनाऱ्यावर एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेली ही जोडी या फोटोत दिसते आहे.

डुबे… हां डुबे…एक दुजे मे यहां… असं कॅप्शन देऊन रणवीरने हा फोटो शेअर केला आहे. तू मास्टरक्लास काम केलं आहेस. तुझं गहराइया सिनेमातलं काम थेट हृदयाला भिडतं आहे. उत्तम अभिनय.. मला तुझा अभिमान वाटतो या आशयाचा मेसेजही रणवीरने लिहिला आहे.

गहराइया या सिनेमात दीपिका पदुकोण, अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी आणि धैर्य कारवा प्रमुख भूमिकेत आहेत. तसंच सिनेमात नसरूद्दीन शाहही एका वेगळ्या भूमिकेत आहेत. या सिनेमाला येणाऱ्या प्रतिक्रिया काहीशा संमिश्र आहेत. कुणाला हा सिनेमा फारच आवडला आहे तर कुणाला हा सिनेमा बोअर वाटला आहे. मात्र दीपिकाच्या अभिनयाचं कौतुक सगळेच करत आहेत. अशात आता तिचा पती आणि अभिनेता रणवीर सिंग याने लिपलॉकचा फोटो शेअर करत दीपिकावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

रोमँटिक सेलिब्रेशन! दीपिका-रणवीरने शेअर केले खास फोटो

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांचं लग्न २०१८ मध्ये झालं आहे. बाजीराव मस्तानी, रामलीला गोलीयो की रासलीला, पद्मवात या सिनेमांमध्येही या दोघांनी एकत्र काम केलं आहे. दीपिका आणि रणवीर 83 या सिनेमातही एकत्र दिसले होते. गहराइया हा सिनेमा संमिश्र प्रतिक्रिया मिळवत असला तरीही रणवीरने पत्नी दीपिकाचं भरभरून कौतुक केलं आहे. तसंच हा फोटोही शेअर केला आहे. ज्यावर विविध प्रतिक्रियाही येत आहेत.

    follow whatsapp