उपमुख्यमंत्री Ajit Pawar जेव्हा रिक्षाची सफारी करतात..

मुंबई तक

• 07:59 AM • 28 Aug 2021

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार नेहमीच आपल्या रोखठोक आणि बेधडक स्वभावामुळे चर्चेत असतात. आज तर अजितदादांनी चक्क रिक्षाची ट्रायल घेतली. अजित दादा आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. बारामती औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या पियाजियो कंपनीने इलेक्ट्रिक रिक्षा ची निर्मिती केली आहे. या रिक्षाची पाहणी करताना अजितदादांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून सर्व माहिती घेतली त्यानंतर मात्र अजितदादा थेट रिक्षात बसले आणि परिसरातून रिक्षाची […]

Mumbaitak
follow google news

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार नेहमीच आपल्या रोखठोक आणि बेधडक स्वभावामुळे चर्चेत असतात. आज तर अजितदादांनी चक्क रिक्षाची ट्रायल घेतली. अजित दादा आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत.

हे वाचलं का?

बारामती औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या पियाजियो कंपनीने इलेक्ट्रिक रिक्षा ची निर्मिती केली आहे. या रिक्षाची पाहणी करताना अजितदादांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून सर्व माहिती घेतली त्यानंतर मात्र अजितदादा थेट रिक्षात बसले आणि परिसरातून रिक्षाची ट्रायल घेतली. गेल्याच आठवड्यात अजित दादांनी एका चहाच्या टपरीवर चहाचा आस्वाद घेतला होता. त्यापूर्वी एका पान टपरी वर त्यांनी पान देखील खाल्ले होते. त्यामुळे सर्वसामान्य बारामतीकरांच्या दादा गळ्यातील ताईत आहेत हेच खरं.

2018 मध्येही केला लोकल प्रवास

मुंबई शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. त्यामुळे अजित पवार यांनी 27 डिसेंबर 2018 ला लोकल प्रवास केला होता. अजित पवार यांना डोंबिवलीत एका नियोजित कार्यक्रमासाठी जायचे होते. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयातून निघाले होते. पण वाहतूक कोंडीमुळे वेळेत कार्यक्रमाला पोहोचू शकत नाही हे त्यांच्या लक्षात आले. त्यातच रस्त्याने प्रवास करणे वाहतूक कोंडीमुळे शक्य नव्हते. त्यामुळे अजित पवार यांनी लोकलने प्रवास केला होता. यावेळी त्यांच्यासोबत कसारा लोकलमध्ये प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड होते. अजित पवार यांनी डोंबिवलीला जाण्यासाठी सीएसएमटीवरून कसारा जलद लोकलने प्रवास केला होता, याचा व्हिडिओ राष्ट्रवादीने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला होता.

27 डिसेंबर 2018 चा व्हीडिओ

11 सप्टेंबर 2016 ला पुण्यात रिक्षाने प्रवास

पुण्यातल्या मानाच्या गणपतींच्या दर्शनासाठी अजित पवार पुण्यात गेले होते. मात्र शनिवार असल्याने रस्त्यावर दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. त्यामुळेच पवारांनी चक्क रिक्षा पकडली आणि केसरीवाड्यात गेले. कसबा गणपती आणि तांबडी जोगेश्वरी गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर अजित पवार मानाचा पाचवा गणपती असलेल्या केसरीवाड्यात दर्शनासाठी निघाले होते. त्यानंतर अप्पा बळवंत चौकात वाहतूक कोंडी झाल्यानं गाडीने जाणे त्यांना शक्य झाले नाही. त्यामुळे तात्काळ त्यांनी रिक्षाने जाण्याचा निर्णय घेतला होता.

    follow whatsapp