OBC Reservation : ठाकरे सरकारमध्ये नेते कमी आणि बोलके पोपट जास्त-फडणवीस

मुंबई तक

• 09:18 AM • 19 Jul 2021

ठाकरे सरकारवर ओबीसी आरक्षणावरून देवेंद्र फडणवीस यांनी टीकास्त्र सोडलं आहे. ठाकरे सरकारमध्ये नेते कमी ओबीसींच्या प्रश्नांवर बोलणारे पोपट जास्त आहेत अशी खरमरीत टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ओबीसींचा खरा पक्ष हा भाजपच आहे हे सांगायलाही ते विसरले नाहीत. ओबीसींना मंत्रिमंडळात स्थान देण्याचं काम मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालं आहे असंही फडणवीस यांनी सांगितलं. मुंबईत झालेल्या […]

Mumbaitak
follow google news

ठाकरे सरकारवर ओबीसी आरक्षणावरून देवेंद्र फडणवीस यांनी टीकास्त्र सोडलं आहे. ठाकरे सरकारमध्ये नेते कमी ओबीसींच्या प्रश्नांवर बोलणारे पोपट जास्त आहेत अशी खरमरीत टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ओबीसींचा खरा पक्ष हा भाजपच आहे हे सांगायलाही ते विसरले नाहीत. ओबीसींना मंत्रिमंडळात स्थान देण्याचं काम मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालं आहे असंही फडणवीस यांनी सांगितलं. मुंबईत झालेल्या भाषणात त्यांनी ठाकरे सरकारवर ओबीसी आरक्षणावरून कडाडून टीका केली.

हे वाचलं का?

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा आहे. पण रोज खोटं बोल पण रेटून बोल, अशा प्रकारे महाविकास आघाडीचे नेते कमी आणि बोलके पोपट जास्त आहेत. नेते कमी बोलतात कारण त्यांना माहित आहे की आपल्या चुकांमुळे राजकीय आरक्षण गेलं. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये बोलके पोपट जास्त आहेत. त्यांचे मालक त्यांना सांगतात तसं ते बोलतात असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करत देशात मोदींच्या नेतृत्वाखाली बहुजनांचं राज्य आहे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

OBC समाजाची फसवणूक आणि विश्वासघात ठाकरे सरकारने थांबवावा-फडणवीस

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात आपलं सरकार असताना केस आली. तेव्हा केस काय होती? पाच जिल्ह्यांमध्ये 50 टक्क्याच्या वरच्या आरक्षणाविरोधातील केस होती. ५० टक्क्याच्या आतल्या आरक्षणाची केसच नव्हती. त्याही वेळेला आपण 50 टक्क्यांचं वरचं आरक्षण वाचवण्यासाठी एक अभ्यास केला आणि त्यातून एक अध्यादेश काढला. तो कोर्टाला सादर केला. सुप्रीम कोर्टाने मान्य केला. 50 टक्क्यांच्या वरचं आरक्षणही मान्य करून पुढे जाण्याची मंजुरी दिली. हे सरकार आल्यानंतर या सरकारला राज्य मागासवर्ग आयोग गठीत करायचा होता आणि इम्पेरिकल डेटा जमा करायचं परिपत्रक काढून सर्वोच्च न्यायालयाला द्यायचा होत्या. सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला पाहिजे तितका वेळ दिला असता. या सरकारनं 15 महिने या सरकारने वाया घालवले. सात वेळा तारखा घेतल्या आणि कोणतीच हालचाल केली नाही’, असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या भाजप ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, संगमलाल गुप्ता, डॉ. संजय कुटे, अतुल भातखळकर, योगेश टिळेकर उपस्थित आहेत.

    follow whatsapp