गुन्हेगाराला होर्डिंग लावायला मी सांगितलं होतं का? पत्रकाराच्या ‘त्या’ प्रश्नावर जेव्हा अजित पवार भडकतात…

मुंबई तक

• 09:02 AM • 21 Jul 2021

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उप-मुख्यमंत्री अजित पवार यांचा रौद्र अवतार पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला. गुरुवारी अजित पवार यांचा वाढदिवस आहे. यानिमीत्ताने पिंपरी-चिंचवड शहरात अजित पवारांना शुभेच्छा देणारी होर्डींग्ज लागली आहेत. यात काही गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांनीही अजित पवारांना शुभेच्छा देणारं होर्गिंड लावलेलं आहे. यावर प्रश्न विचारला असतान अजित पवार पत्रकारांवरच भडकलेले पहायला मिळाले. “गुन्हेगारांना होर्डिंग्ज […]

Mumbaitak
follow google news

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उप-मुख्यमंत्री अजित पवार यांचा रौद्र अवतार पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला. गुरुवारी अजित पवार यांचा वाढदिवस आहे. यानिमीत्ताने पिंपरी-चिंचवड शहरात अजित पवारांना शुभेच्छा देणारी होर्डींग्ज लागली आहेत. यात काही गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांनीही अजित पवारांना शुभेच्छा देणारं होर्गिंड लावलेलं आहे. यावर प्रश्न विचारला असतान अजित पवार पत्रकारांवरच भडकलेले पहायला मिळाले.

हे वाचलं का?

“गुन्हेगारांना होर्डिंग्ज लावायला मी सांगितलं होतं का? वाढदिवसानिमित्ताने होर्डिंग्ज लावू नका, बॅनरबाजी करू नका, असं आवाहन मी केलं होतं. माझ्या विवेकबुद्धीला स्मरून मी हे आवाहन केलं होतं. उद्याच्याला कोणी काय केलं ते चुकीचं असेल तर पोलिसांनी कारवाई करावी. त्यांना कारवाईसाठी कधीच बंदी केलेली नाही”, असं अजितदादा म्हणाले.

पिंपरी-चिंचवडमध्ये मी आज येत नाही महाराज, मी अनेक वर्षांपासून येतो. पिंपरी चिंचडवकरांना माझी सर्व मते स्पष्टपणे माहीत आहेत. तुम्ही काही तरी नवी गोष्ट काढण्यासाठी कोणता तरी मुद्दा सोडायचा आणि प्रश्न विचारायचे हे धंदे बंद करा, असा दम भरतानाच अनधिकृत होर्डिंग लावायला मी सांगितलं नाही. एक मिनिट… मी नियमांचं पालन करणारा माणूस आहे. होर्डिंग चुकीची लागले असेल तर भाजपची सत्ता आहे. आयुक्त महापौरांनी किंवा शहराचं कामकाज ज्यांच्या हातात आहे, त्यांनी त्यावर कारवाई करावी, असं म्हणत अजित पवारांनी काढता पाय घेतला.

यावेळी बोलत असताना अजित पवारांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. “लसीकरण मोठ्या प्रमाणावर झालं आहे. त्यामुळे ज्यांना दोन डोस देण्यात आले आहेत. त्यांना बाहेर पडायला टप्प्याटप्प्याने सुरुवात केली पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. याबाबत मी परवा मुख्यमंत्र्यांशी बोलेल. पण लोकांना बाहेर पडण्याची मुभा द्यावी की देऊ नये याबाबतचे वेगवेगळे मतप्रवाह आहेत. काहींच्या मते इथून पुढे 100 ते 120 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. या दिवसात लोकांनी नियमावलीचं तंतोतंत पालन केलं पाहिजे. सोलापुरातील एका गावात मी गेलो होतो. तेव्हा लोक मास्कशिवाय फिरताना दिसले. अशी बेपर्वाई बरी नाही. एक देखील बाधित व्यक्ती अनेकांना बाधित करू शकते. त्यामुळे बारकाईने वागण्याची गरज आहे”, असंही ते म्हणाले.

    follow whatsapp